ETV Bharat / city

Crime In Mumbai : मुंबईतील अँटोप हिल परिसरात तरुणाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न - Murder of a young man in the Antop Hill area

अँटोप हिल परिसरात तरुणाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्रीची आहे. (Murder of a young man in the Antop Hill area) पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अब्दुल सलाम मुनवर अली सय्यद असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे वय २९ वर्षे आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Mar 1, 2022, 12:34 PM IST

मुंबई - मुंबईतील अँटोप हिल परिसरात तरुणाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्रीची आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Murder of a young man in the Antop Hill area) अब्दुल सलाम मुनवर अली सय्यद असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे वय २९ वर्षे आहे.

मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत

अब्दुलला काही लोकांनी अँटोफिल भागातील केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाठीमागे सेक्टर क्रमांक १ मध्ये बोलावले. घटनास्थळी गेल्यावर त्याच्यावर बेदम मारहाण करण्यात आली, त्यामुळे मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

अज्ञात आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली

अज्ञात आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि तो बेशुद्ध पडल्यावर त्याच्यावर द्रव टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी अँटोफिल पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा - Operation Ganga : युक्रेनमधून १८२ भारतीयांचे सातवे ऑपरेशन गंगा विमान मुंबईत पोहोचले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.