ETV Bharat / city

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी गावातील रहिवाशी आहेत. मागील सहा महिन्यापासून जाधववाडी गावातील शिंदे कुटुंबासोबत सुभाष जाधव यांचे शेत जमिनीवरुन वाद सुरु होता.

author img

By

Published : Aug 22, 2021, 8:11 PM IST

Updated : Aug 22, 2021, 8:26 PM IST

व्यक्तीचा मृत्यू
व्यक्तीचा मृत्यू

मुंबई - मंत्रालयाच्या गेटवर काही दिवसापूर्वी सुभाष सोपान जाधव (५४) या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुभाष यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा आज (रविवार) मृत्यू झाला आहे.

सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी गावातील रहिवाशी आहेत. मागील सहा महिन्यापासून जाधववाडी गावातील शिंदे कुटुंबासोबत सुभाष जाधव यांचे शेत जमिनीवरुन वाद सुरु होता. या वादातुन चार वेळा हाणामारी, शिवगाळ, भांडणे झाली असुन याबाबत मंचर पोलिसांत शिंदे यांच्यावर तीन तर जाधव यांच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र अशातच आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना मनात घेऊन सुभाष जाधव मंत्रालयात पोहचले. मात्र मंत्रालयाच्या गेटमधून प्रवेश दिला नसल्याने त्यांनी विषारी औषध प्रशान करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

वाचा, नेमके काय आहे प्रकरण?- मंत्रालयासमोर विष पिऊन पुण्यातील जाधव यांचा आत्महत्येचा प्रयत्न; वाचा नेमके काय आहे प्रकरण

Last Updated : Aug 22, 2021, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.