ETV Bharat / city

हॅलो मी शरद पवार बोलतोय! शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून अधिकाऱ्याला गंडवण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची एका अज्ञात व्यक्तीने हुबेहुब नक्कल केली आहे. आता नक्कल करण्यात काय वेगळेपण? असे आपण म्हणाल, मात्र, या अज्ञात व्यक्तीने आवाजाची हुबेहुब नक्कल केली आणि थेट फोन लावला तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिरिक्त सचिवांना. तो फोन होता बदल्यांसाठी. दरम्यान, या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

author img

By

Published : Aug 12, 2021, 5:28 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची एका अज्ञात व्यक्तीने हुबेहुब नक्कल केली आहे. आता नक्कल करण्यात काय वेगळेपण? असे आपण म्हणाल, मात्र, या अज्ञात व्यक्तीने आवाजाची हुबेहुब नक्कल केली आणि थेट फोन लावला तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिरिक्त सचिवांना. तो फोन होता बदल्यांसाठी. दरम्यान, या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

बदली करण्याची केली मागणी

सध्या अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून जोरदार राजकारण सुरू आहे. अनेकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना याच बदलीच्या कारणावरून धारेवर धरले आहे. अशातच एक अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल केली आहे. त्यामध्ये त्याने मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना फोन केला आहे. यामध्ये अमुक एका अधिकाऱ्याची अमुक ठिकाणी बदली करावी असे तो अज्ञात व्यक्ती सांगतो आहे.

गावदेवी पोलीस ठाणे येथे तक्रार

संशय आल्याने अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी या फोनची फेर तपासणी केली. तपासणीनंतर असे समोर आले, की शरद पवार यांच्याकडून असा कोणताही फोन आला नाही. हा फेक फोन असल्याचे यावेळी समोर आले आहे. या प्रकरणाची आशिष कुमार सिंह यांनी गावदेवी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.