ETV Bharat / city

Silver Oak Attack : शरद पवारांच्या घरावर हल्ला.. फडणवीस, दरेकर, आठवले, चंद्रकांत पाटील, शेलार म्हणाले.. - प्रवीण दरेकर सिल्व्हर ओक हल्ला

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार आदींनी शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिल्या ( Opposition Reactions On Silver Oak Attack ) आहेत.

शरद पवारांच्या घरावर हल्ला.. फडणवीस, दरेकर, आठवले, चंद्रकांत पाटील, शेलार म्हणाले..

author img

By

Published : Apr 8, 2022, 8:35 PM IST

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला, आंदोलनावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार आदींनी प्रतिक्रिया दिल्या ( Opposition Reactions On Silver Oak Attack ) आहेत. पाहुयात कोण काय म्हणाले..

देवेंद्र फडणवीस : ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो. ( Devendra Fadnavis On Silver Oak Attack )

  • ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. @PawarSpeaks

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रवीण दरेकर : खरंतर अशावेळी पवार साहेबांनी मार्ग काढण्याची आवश्यकता होती, कारण एसटी संघटनेच्या अधिवेशनामध्ये विलीनीकरणाचा शब्दच त्यांनी दिला होता. मग आता आपण सरकारचे सर्वेसर्वा असताना विलीनीकरण नाही. ( Pravin Darekar On Silver Oak Attack )

  • हे पाषाणी हृदयाचं सरकार आहे. गेल्या ५ महिन्यांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु असतांना १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या व माझ्या १२० भगिनी विधवा झाल्या. पोटाची खळगी भरण्यासाठी ते आंदोलन करतांना त्याला राजकीय स्वरूप हे महाविकास आघाडीचे सरकार देऊ पाहत आहेत यापेक्षा (1/3) pic.twitter.com/4MGnoBknrJ

    — Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रामदास आठवले : ज्येष्ठ लोकनेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत कोणत्याही नेत्याच्या घरावर हल्ला होऊ नये.राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आहे.पण हल्ला करणे निषेधार्ह आहे. ( Ramdas Athawale On Silver Oak Attack )

  • ज्येष्ठ लोकनेते @PawarSpeaks यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत कोणत्याही नेत्याच्या घरावर हल्ला होऊ नये.राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आहे.पण हल्ला करणे निषेधार्ह आहे.

    — Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चंद्रकांत पाटील : राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन कुटुंबीय वेठीस धरले जातील असं आंदोलन करणं आपली परंपरा नाही. त्यामुळे शरद पवारजी यांच्या घरी जाऊन आंदोलकांनी रोष व्यक्त करणं चुकीचंच. मात्र, त्यांच्या रोषाची दखल मविआ सरकारनं आता तरी घ्यावी, अशी अपेक्षाही या निमित्तानं व्यक्त करतो. ( Chandrakant Patil On Silver Oak Attack )

  • राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन कुटुंबीय वेठीस धरले जातील असं आंदोलन करणं आपली परंपरा नाही. त्यामुळे शरद पवारजी यांच्या घरी जाऊन आंदोलकांनी रोष व्यक्त करणं चुकीचंच. मात्र, त्यांच्या रोषाची दखल मविआ सरकारनं आता तरी घ्यावी, अशी अपेक्षाही या निमित्तानं व्यक्त करतो.

    — Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आशिष शेलार : कुणाच्याही घरावर आंदोलन करणे अयोग्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आज ज्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले ते अयोग्य, चुकीचे व असमर्थनीय आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. सदर घटना घडत असताना घराच्या परिसरात पोलीसांची संख्या कमी होती हे लक्षात आणून देत तात्काळ पोलीस बळ वाढवण्यात यावी अशी विनंती केली. दरम्यान,गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत.त्यांच्या मागण्या सरकारने योग्य पध्दतीने ऐकून घ्यायला हव्यात. त्यातून मार्ग काढणे अपेक्षित आहे,अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे. ( Ashish Shelar On Silver Oak Attack )

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.