ETV Bharat / city

Silver Oak Attack Intelligence Fauilure : शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अन् गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचे मुद्दे..

author img

By

Published : Apr 9, 2022, 8:10 PM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ( Silver Oak Attack ) मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत ( Mumbai Police Intelligence Failure ) आहेत. शरद पवारांच्या घरावरील हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अन् गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचे मुद्दे..

मुंबई- मुंबई पोलिसांची एक वेगळीच ओळख जगभरात आहे. मुंबई पोलिसांची स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत एकेकाळी तुलना होत होती. मात्र, आता ही तुलना इतिहासजमा होऊ लागली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन ( Silver Oak Attack ) हे पोलिसांचे अपयश आहे का? अशीही चर्चा सुरु झाली आहे. मुंबईत आयबी, एसआयटी आणि मुंबई पोलिस यासारख्या यंत्रणा असतानादेखील या यंत्रणांना चकवा देत एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचा संदर्भात वेगवेगळे प्रश्‍न उपस्थित होत ( Mumbai Police Intelligence Failure ) आहेत.

एकाचवेळी आंदोलक आले कसे : शरद पवार यांचे दक्षिण मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे शुक्रवारी एसटी संपकरी आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला. दगड, चप्पल फेकून झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईतील पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणात संपकरी हे सिल्व्हर ओकवर दाखल होत असताना पोलीस यंत्रणेला याबाबतची कोणतीही खबर लागली नाही. त्यामुळेच राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश असल्याची टीका यानिमित्ताने होऊ लागली आहे. एकाचवेळी शेकडो आंदोलनकर्त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात घोषणा देत चप्पल, दगडफेक करत हल्ला केला. त्यामुळेच अचानक झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी गेल्या पाच महिन्यापासून ठिय्या आंदोलन करत आहेत.

मुंबईकरांचा सवाल : मुंबईतील पोलिस विभागावर मोठ्या प्रमाणात टीका होताना पाहायला मिळत आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील महत्वाचे नेते असून गुप्तचर यंत्रणेला पवार त्यांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार हे जर माहित नसेल तर इतर सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेविषयी पोलीस विभाग जागरूक असेल का? असा प्रश्न अनेक मुंबईकरांकडून उपस्थित केला आहे.

प्रशिक्षणावरच प्रश्नचिन्ह : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात आम्ही काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेतून या संदर्भातील त्रुटी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की, राज्यातील गुप्तचर यंत्रणेमध्ये ज्याप्रकारे पोलिस, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर ते किती त्या प्रशिक्षणावर खरे उतरतात याची माहिती नाही. यासंदर्भात कुठलीही चाचणी घेण्यात येत नाही. तेव्हा अधिकारी किती सक्षमपणे हे काम करू शकतो, यासंदर्भात कुठल्याही प्रकारची चाचणी करण्यात येत नाही.

ठिकाण माहित नसल्याने गोंधळ : गुप्तचर विभागाकडून एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा एक मेसेज देण्यात आला होता. मात्र, कर्मचारी कोणत्या ठिकाणी आंदोलन करणार, यासंदर्भात गुप्तचर विभाग माहिती काढण्यात अपयशी ठरला आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, आंदोलनाची माहिती मिळाली होती. मात्र, कोणत्या ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन करणार हे माहित नसल्याने हा सर्व गोंधळ झाला आहे.

तज्ज्ञांचे मत : शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणार होता ही माहिती जर पत्रकारांना मिळू शकते तर, मुंबईतील गुप्तचर विभागाला का मिळू शकत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुप्तचर विभागाचे काम फक्त माहिती आणायचे नसून, तर त्या माहितीचे विश्लेषण करणे देखील असते. एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेले आजपर्यंतचे भाषण आणि घोषणा पाहता पोलीस विभागाने या सर्व गोष्टीचे विश्लेषण करून पूर्वतयारी करायला पाहिजे होती. त्यात गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली आहे. मात्र, गुप्तचर विभागावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शासकीय आणि प्रशासकीय वकूब नसल्याचा परिणाम देखील असू शकतो, असे मत निवृत्त पोलीस एसीपी धनराज वंजारे यांनी म्हटले आहे.

गुप्तचर यंत्रणेतील प्रमुख त्रुटी

  • गुप्तचर यंत्रणेने ज्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण करायला पाहिजेत होते, त्याप्रमाणात करण्यात आले नाही.
  • गुप्तचर यंत्रणेवर वरिष्ठ प्रशासक आणि प्रशासनिक नेतृत्वाच्या समन्वयाचा अभाव या घटनेतून समोर आला आहे.
  • शासन आणि वरिष्ठ पातळीवरचा पोलीस प्रशासनातील योग्य नेतृत्वाचा अभाव दिसून आला.
  • गुप्तचर यंत्रणेतील पोलिस अधिकाऱ्यांवर असलेला ताण आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा संख्या, हेही यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.