मुंबई - दहशतवादविरोधी पथकाच्या काळाचौकी टिमला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत 85 बांगलादेशी नागरिकांना अनधिकृतपणे बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक व पासपोर्ट मिळवून देणाऱ्या 3 जणांच्या टोळीला अटक केली आहे. दहशतवादी विरोधी पथकाने शिवडी परिसरातून 29 नोव्हेंबर रोजी अक्रम नूर नबी अलाउद्दीन शेख या बांगलादेशी आरोपीला अटक केली होती. या आरोपीच्या झालेल्या चौकशीदरम्यान या मागे एक मोठे रॅकेट मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील मुंब्रा परिसरात कार्यरत असल्याचं समोर आलं होतं.
..आतापर्यंत 85 बांगलादेशी नागरिकांना दिले आहेत भारतीय पासपोर्ट -
अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी आरोपीला बनावट कागदपत्र तयार करून त्याच्या नावावर पॅन कार्ड, आधार कार्ड व पासपोर्ट बनवून देणाऱ्या ठाण्यातील कौसा मुंब्रा येथे राहणाऱ्या रफिक रहमतुल्ला सय्यद या आरोपीला पोलिसांनी अटक केली. हा आरोपी 2013 पासून पासपोर्ट दलाल म्हणून काम करत असल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर शोध घेतला असता आतापर्यंत या आरोपीने 446 लोकांचे पासपोर्ट बनवून दिले आहेत. या 446 लोकांमध्ये 85 बांगलादेशी नागरिकांना बनावट ओळखपत्राच्या आधारावर पासपोर्ट मिळवून देण्याचंही आरोपीने कबूल केलेले आहे.
कौसा मुंब्रा येथून अटक केलेल्या रफिक रहमतुल्ला सय्यद याची चौकशी केली असता पोलिसांनी मोहम्मद शेख, गंगाराम केदारे, नितिन राजाराम निकम या 3 आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत दहशतवादविरोधी पथकाने आक्रम सोहेल, अब्दुल सुभान शेख, अब्दुल खैर समसुल शेख व अब्दुल हाशम शेख या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी आरोपी अक्रम शेख याच्याकडून तब्बल आठ लाख ३० हजार रोख रक्कम पोलिसांना मिळून आली असून इतर बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे.
एटीएसकडून 85 बांगलादेशी नागरिकांना भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या टोळीला अटक
दहशतवादविरोधी पथकाने 4 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. मुंबईत 85 बांगलादेशी नागरिकांना अनधिकृतपणे बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक व पासपोर्ट मिळवून देणाऱ्या 3 जणांच्या टोळीला अटक केली आहे.