मुंबई एटीएम मशीनमध्ये कॅश डीपोजीट करणाऱ्या कंपनीचा Goregaon ATM Cash robbery वाहनचालक 2 कोटी 80 कोटी रुपये घेऊन फरार झाल्याची घटना सोमवारी 5 सप्टेंबरला गोरेगांव येथे घडली आहे. कंपनीचे कर्मचारी एटीएममध्ये रोकड जमा करण्यासाठी ATM machine money absconded by Driver in Mumbai गेले असता वाहनचालक 2.80 कोटींनी भरलेले वाहन घेऊन फरार झाला. मुंबई पोलिसांनी सोमवारी दुपारी घटना घडताच व्हॅनच्या चालकाचा शोध सुरू केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील युनियन बँकेत Union Bank in Goregaon कॅश भरणारी व्हॅन पैसे भरण्यासाठी पोहोचली असताना ही घटना घडली. कर्मचारी एटीएम मशीनमध्ये रोकड जमा करण्यात व्यस्त असताना उदय भान सिंग नावाचा चालक पैसे असलेल्या व्हॅनसह पळून गेला. हा वाहन चालक दोन महिन्यांपूर्वी कंपनीत चालक म्हणून रुजू झाला होता. एटीएम मशीनमध्ये कॅश डिपोझिट करायला गेलेले चालकाचे सहकारी कॅश व्हॅन ज्या ठिकाणी उभी होती त्या ठिकाणी परतल्यानंतर कर्मचाऱ्यांना ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी जीपीएस ट्रॅकर तपासला.
व्हॅन सापडली, पण आरोपी फरारही व्हॅन पिरामल नगर भागाकडे गेल्याचे समजले. ही बाब तात्काळ गोरेगाव पोलिसांना कळवण्यात आली. त्यांनी कारवाई करत जवळच्या पोलीस ठाण्यांना सतर्क केले. पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या उत्तर विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गोरेगाव पश्चिमेतील पिरामल नगर परिसरात एका निर्जन ठिकाणावरून व्हॅनचा शोध घेऊन ती जप्त करण्यात पोलिसांना यश आले. परंतु चालक अद्याप फरार आहे. आरोपींनी 2.80 कोटी रुपयांची रोकड पळवल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.