ETV Bharat / city

Kalpita Pimple - फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक आयुक्त पिंपळे पुन्हा सेवेत रुजू, म्हणाल्या.. - फेरीवाला हल्ला आयुक्त कल्पिता पिंपळे

फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माजीवडा - मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे ( Assistant Commissioner Kalpita Pimple resume service ) आणि त्यांचा सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे पुन्हा एकदा आपल्या सेवेत रुजू झाले आहेत. तब्बल 3 महिन्यांच्या वैद्यकीय सुट्टीनंतर त्यांनी प्रथमच ठाणे महापलिकेच्या मुख्यलायत पाऊल ठेवले.

Assistant Commissioner Kalpita Pimple resume service
सहाय्यक आयुक्त पिंपळे
author img

By

Published : Dec 2, 2021, 2:09 AM IST

ठाणे - फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माजीवडा - मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे ( Assistant Commissioner Kalpita Pimple resume service ) आणि त्यांचा सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे पुन्हा एकदा आपल्या सेवेत रुजू झाले आहेत. तब्बल 3 महिन्यांच्या वैद्यकीय सुट्टीनंतर त्यांनी प्रथमच ठाणे महापलिकेच्या मुख्यलायत पाऊल ठेवले.

माहिती देताना सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे

हेही वाचा - Thane 7 Corona negative report : हुश्श !!! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सात जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

झालेल्या हल्ल्याला न घाबरता पुन्हा त्याच ठिकाणी काम करण्याची इच्छा पिंपळे यांनी दर्शविली असून, भविष्यात सतर्क राहून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्पिता पिंपळे यांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली असता, महापौरांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक पवन कदम, उपायुक्त वर्षा दीक्षित व अश्विनी वाघमळे उपस्थित होत्या.

अनधिकृत फेरीवल्यावर कारवाईच्या दरम्यान झाला होता हल्ला

अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर ३० ऑगस्ट रोजी हल्ला झाला. अनधिकृत फेरीवल्यावर कारवाई करण्याच्या दरम्यान हा हल्ला झाला होता. दरम्यान या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे निकामी झाली असताना तब्बल ३ महिने त्याचावर उपचार सुरू होते. झालेला हल्ला हा माझ्यावर नसून माझ्या कुटुंबीयावर असल्याची प्रतिक्रिया यावेळी कल्पिता पिंपळे ( Kalpita Pimple ) यांनी दिली.

दरम्यान ठाणे शहर अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यासाठी आमची भूमिका असते. तेच काम मी करत होते. मात्र, काही मुजोर फेरीवाल्यांमुळे नाव खराब झाले असून माझ्यावर झालेला हल्ला एकदिवसाचा होता, मात्र याची यातना अजून पर्यंत माझ्या मनात असल्याचे यावेळी पिंपळे यांनी सांगितले. भविष्यात रस्त्यावर उतरून काम करण्याची माझी इच्छा असून, लवकरच पुन्हा माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी रस्त्यावर काम करताना दिसणार असल्याचा विश्वास यावेळी कल्पिता पिंपळे यांनी व्यक्त केला.

आधीच्या अधिकाऱ्यांनी केली डोळेझाक

कल्पिता पिंपळे यांच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी नियम आणि कर्तव्य दक्षता याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळेच फेरीवाल्यांची मजल हल्ला करण्यापर्यंत गेली होती. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर पिंपळे यांनी उत्तर देणे टाळले, मात्र आता पुढे काय करायचे, याबाबत त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

माझे कुटुंब महत्वाचे

हल्ला झाल्या नंतर कुटुंबाने ज्या पद्धतीने माझी काळजी घेतली आणि त्यामुळेच 6 महिन्यांच्या कालावधी आधीच मी बरी झाली, असे पिंपळे यांनी सांगितले. अगदी दोन्ही हात काम करत नसताना लहान मुलांसारखे माझा संभाळ केल्याचे सांगताना कल्पिता यांच्या डोळ्यात पाणी देखील आले.

हेही वाचा - New Mumbai Police Commissioner : वाझे-परमबीर यांच्या भेटीबद्दल आम्हाला माहिती नाही - नवी मुंबईचे पोलीस आयुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.