ETV Bharat / city

Aslam Shaikh About Lata Mangeshkar Health : लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली; पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले... - lata Mangeshkar health latest news

मुंबई - ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती ( lata Mangeshkar health update ) पुन्हा एकदा ढासळली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्हेंटिलेटरवर ( Veteran singer Lata Mangeshkar on ventilator ) आहेत. त्या आयसीयूमध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत असे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये त्या उपचार घेत आहेत, याबाबत बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्या आरोग्याबाबत प्रार्थना ( Aslam Shaikh about Lata Mangeshkar Health ) केली आहे. त्यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांची प्रकृती थोडी खालावली आहे अशी माहिती मिळाली आहे. आम्ही अशी प्रार्थना करत आहोत की त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी.

Aslam Shaikh About Lata Mangeshkar Health
लता मंगेशकर आणि अस्लम शेख
author img

By

Published : Feb 5, 2022, 3:24 PM IST

Updated : Feb 5, 2022, 4:07 PM IST

मुंबई - ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती ( lata Mangeshkar health update ) पुन्हा एकदा ढासळली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्हेंटिलेटरवर ( Veteran singer Lata Mangeshkar on ventilator ) आहेत. त्या आयसीयूमध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत असे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले आहे.

लता मंगेशकर आणि अस्लम शेख

अस्लम शेख म्हणाले -

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये त्या उपचार घेत आहेत, याबाबत बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्या आरोग्याबाबत प्रार्थना ( Aslam Shaikh about Lata Mangeshkar Health ) केली आहे. त्यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांची प्रकृती थोडी खालावली आहे अशी माहिती मिळाली आहे. आम्ही अशी प्रार्थना करत आहोत की त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी.

सर्व स्तरातून प्रार्थना -

लतादीदींच्या प्रकृतीसाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. त्या लवकरात लवकर बरे व्हाव्यात यासाठी अयोध्येत महामृत्यूंजय मंत्राचा जप करण्यात आला होता. यावेळी तिथल्या महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकरांची भेट घ्यावी, अशी मागणी केली होती. अयोध्येतील आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीत महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. महायज्ञ तपस्वी पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य यांच्या नेतृत्वाखाली होम करण्यात आले होते. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घालून महाआरती केली होती.

Last Updated : Feb 5, 2022, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.