ETV Bharat / city

सगळे मिळून आला तरी संख्या शून्याच्या वर जाणार नाही - आशिष शेलार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या आज शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट घेणार आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपाने कडाडून टीका केली आहे.

author img

By

Published : Dec 1, 2021, 8:01 PM IST

Updated : Dec 1, 2021, 8:29 PM IST

Ashish Shelar'
Ashish Shelar'

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. राज्य सरकार म्हणून त्यांचे स्वागत करणे योग्य आहे मात्र महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये नेण्याचे आवाहन करणाऱ्या ममतांना कशा पायघड्या घालता? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची ममता बॅनर्जी यांच्याशी झालेली भेट नेमकी कशासाठी होती? या बैठकीत काय झाले? याचा तपशील जनतेला समजला पाहिजे. अशी मागणीही भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे

सगळे मिळून आला तरी शून्य - शेलार

भाजप विरोधी आघाडी उघडण्यासाठी ममता बॅनर्जी आग्रही आणि आक्रमक आहेत. यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांच्याशी जरी संधान बांधले. हे सगळे मिळून जरी एकत्र आले तरीसुद्धा यांची संख्या शून्य आहे आणि ती शून्याच्या वर जाणार नाही, असा दावा शेलार यांनी यावेळी बोलताना केला.

भाजप नेते आशिष शेलार प्रतिक्रिया देताना
काँग्रेसला अतिशय तुच्छ वागणूक - शेलार
काँग्रेसला राज्यात अतिशय तुच्छ आणि हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. मात्र, तरीही जर काँग्रेसला त्यांच्या मागेच ससेहोलपट करून घ्यायची असेल तर आमचं काहीही म्हणणं नाही. काँग्रेसला स्वतःची इज्जत नसेल तर आम्ही काय करणार, असा टोलाही शेलार यांनी यावेळी लगावला.
ममतांना हिंदुराष्ट्र मान्य आहे का?
ममता बॅनर्जी यांनी जय मराठा, जय बांगला अशी घोषणा दिली. मात्र ममतांना हिंदुराष्ट्र मान्य आहे का आणि नसेल तर शिवसेनेची ममतांसोबतची भूमिका काय? हे शिवसेनेने स्पष्ट करावं, असेही शेलार यांनी म्हटले. दरम्यान, राज्यातील स्थानिक तरुणांना वडापावचे स्टॉल लावून द्यायचे आणि राज्यातील कारखाने राज्याबाहेर घालवायचे असा डाव शिवसेनेचा आहे का, असा सवालही शेलार यांनी यावेळी केला.

Last Updated : Dec 1, 2021, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.