मुंबई - राज्यभरात सत्ता स्थापनेवरून पक्षांमधील मतमतांतरे कायम असून, याद्वारे उद्भवलेला सत्ता संघर्ष विकोपाला जात असल्याचे चित्र आहे. एकिकडे सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेना व आघाडीला यश येत आहे. यामुळे भाजपने स्वीकारलेल्या 'वेट अॅन्ड वॉच' भूमिकेला पक्षातील नेत्यांकडूनच सुरुंग लागत आहे. यातच भाजप नेते अशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडल्याने भाजप व सेनेतील कटूता वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
-
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत...मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही... मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha @manoj_kotak @BJP4Maharashtra @bjp4mumbai
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत...मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही... मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha @manoj_kotak @BJP4Maharashtra @bjp4mumbai
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत...मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही... मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha @manoj_kotak @BJP4Maharashtra @bjp4mumbai
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019
मुंबई महानगरपालिकेत भाजप तुल्यबळ आहे. मात्र, संख्याबळ नसल्याने महापौर शिवसेनेचा आहे. मात्र, आता 2022 मध्ये मुंबईचा महापौर स्वबळावर तसेच संख्याबळावर आणणार असल्याचे ट्वीट शेलार यांनी केले आहे.
सध्या राज्यात भाजपकडे संख्याबळ असूनही ते सत्तेपासून दूर असल्याचे चित्र आहे. मित्रपक्ष शिवसेना आघाडीसोबत युती करून सत्तेवर येणार असल्याची खलबतं राज्यभरात सुरू आहेत. अशातच शेलार यांनी मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्ता आणून भाजपचा महापौर बसवणार असल्याचे ट्वीट करून शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.