मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेनेने शिंदे सरकार आणि भाजपला खिंडीत पडकले ( Vedanta Foxconn project Case ) आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर आरोपांचा भडिमार सुरू आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज वेंदाता प्रकल्पात किती टक्केवारी मागितली, असा गंभीर आरोप ( Serious Allegation of BJP Leader Ashish Shelar ) करीत शिवसेनेने हिशोब द्यावा, अशी मागणी केली आहे. शिवसेनेकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. मात्र, मनपा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद चांगलाच चिघळणार ( Shiv Sena has Hit Shinde Government and BJP ) आहे.
वेदांता फाॅक्सकाॅन सेमीकंडक्टरचा प्रकल्पावरून राज्यात राजकीय चिखलफेक : पुण्यातील तळेगावला होणारा वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. तीन कंपन्यांच्या शर्यतीत कुठेही नसलेल्या गुजरातमध्ये हा प्रकल्प गेल्याने शिवसेनेसह महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडूनही टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, वेंदाताचा राज्यातील प्रकल्पाबाबतचा अहवाल बाहेर आला आहे.
आशिष शेलारांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप : मुख्यमंत्री शिंदे यांनी वेदांता महाराष्ट्रात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, अचानक हा प्रकल्प गुजरात गेल्याने विरोधकांकडून टीकेची धार तीव्र झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी यावरून शिवसेना आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टोला लगावला आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात राहावा, यासाठी वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले होते, असा सवाल शेलारांनी विचारला आहे.
शेलार यांचा शिवसेनेवर गंभीर आरोप, किती टक्केवारी मागितली असा सवाल : शेलार यांनी ट्विट करीत शिवसेनेच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच 10% नुसार हिशेब मागितला की, मुंबई पालिकेतील रेटनुसार, असा प्रतिप्रश्न विचारला. सब गोलमाल है, चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीदेखील शेलार यांनी केली आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती, तसेच अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10% लाच द्यावी लागत होती, इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा दाखला शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिला आहे.