ETV Bharat / city

Ashish Shelar on Police case: जितका आवाज दाबला जाईल तितक्याच ताकदीने समोर येऊ - आशिष शेलार - Ashish Shelar on police case

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Police case against Ashish Shelar ) झाला होता. याप्रकरणी भाजप नेत्यांनी व महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज आशिष शेलार यांना जामीन मंजूर झाला आहे. जामीन जरी मंजूर झाला असला तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आशिष शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकार तसेच शिवसेनेवर सडकून ( Ashish Shelar Slamed Mahavikas Aghadi ) टीका केली आहे.

आशिष शेलार
आशिष शेलार
author img

By

Published : Dec 9, 2021, 4:34 PM IST

Updated : Dec 9, 2021, 4:53 PM IST

मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान ( objectionable statement against Mumbai Mayor ) केल्याप्रकरणात जामिन मिळाल्यानंतर भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी ( Ashish Shelar Slamed Mahavikas Aghadi ) महाविकास आघाडी सरकारविरोधात सडकून टीका केली आहे. जितका आमचा आवाज दाबला जाईल, तितक्याच ताकदीने आम्ही समोर येऊ, असेही अशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात भाजप नेते आशिष शेलार ( Police case against Ashish Shelar ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी भाजप नेत्यांनी व महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज आशिष शेलार यांना जामीन ( Bail to Ashish Shelar ) मंजूर झाला आहे. जामीन जरी मंजूर झाला असला तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आशिष शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकार तसेच शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

जितका आवाज दाबला जाईल तितक्याच ताकदीने समोर येऊ

हेही वाचा-Ashish Shelar vs Mumbai Mayor : मुंबई महापौरांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात आशिष शेलार यांना जामीन मंजूर

काय म्हणाले आशिष शेलार?

भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, ( Ashish Shelar stand on Marine drive police case ) की माझी भूमिका स्पष्ट आहे. मी कुठल्याही व्यक्तीला महिला व महिला महापौरांना उद्देशून असे बोललो नाही. व्यवस्थेच्या विरोधातील आक्रोश अंगावर आल्यावर त्यापासून लपण्यासाठी स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याचे काम शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या लोकांनी केले आहे. जी केस बनूच शकत नाही, ती बनविण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही कायदा-सुव्यवस्था मानणारे व कायद्याचे पालन करणारे लोक आहोत. खोटा गुन्हा दाखल केला गेला. त्याचा आज मी जामीन घेतला आहे. परंतु हा एफआयआर दाखल केल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची प्रतसुद्धा पोलीस स्टेशनला दिली आहे. न्यायिक व्यवस्थेतून मी सत्य बाहेर आणेन. शिवसेना व महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात संघर्ष अजून मजबूत करू, असा त्यांनी इशारा दिला.

हेही वाचा-भाजप नेत्यांनी आम्हाला संस्कारांचे धडे द्यावेत हा मोठा 'विनोद' -यशवंत जाधव

संजय राऊत यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा-

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी एकच हल्लाबोल केला होता. शिवसेना विरोधात घोषणाबाजी करत शेकडोंच्या संख्येने नेते महिला कार्यकर्ते तिथे उपस्थित झाले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत बोलताना महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्यावरही एफआयआर दाखल करा, अशी मागणी करत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही संजय राऊत यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

हेही वाचा-Shelar Vs Pednekar : आशिष शेलारांना गप्प करण्यासाठीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला - देवेंद्र फडणवीस

काय आहे प्रकरण?

आमदार आशिष शेलार यांनी वरळी बीडीडी चाळीत झालेल्या सिलेंडर ब्लास्ट मध्ये मृत्युमुखी पडलेल्या ४ महिन्याच्या चिमुकल्या बद्दल बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल भाजप पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत महापौर किशोर पेडणेकर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात स्वतः जाऊन आमदार आशिष शेलार यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार आशिष शेलार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Last Updated : Dec 9, 2021, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.