ETV Bharat / city

Ashish Shelar Meet Raj Thackeray : आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

काल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ( MNS chief Raj Thackeray ) वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

MNS chief Raj Thackeray
आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट
author img

By

Published : Oct 16, 2022, 3:08 PM IST

मुंबई : काल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ( MNS chief Raj Thackeray ) वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. या भेटीत एक तास वीस मिनिटं त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यामुळे पुन्हा मनसे व भाजप, शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ( Andheri East ByElection ) ही सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या : अंधेरी पूर्व, पोटनिवडणुकीनिमित्त मुंबईत नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीची सर्व जबाबदारी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आशिष शेलार यांनी आज राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे आशिष शेलार यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

राजकीय चर्चांना उधाण ? मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मंत्री तानाजी सावंत आणि मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. गेल्या 3 महिन्यांत ही दोघांची तिसरी भेट झाली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीचे नेमके काय कारण आहे, हे समजू शकले नसले तरी अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात दोघांमध्ये जास्त चर्चा झाल्याचे समजते. काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भेटीत राजकीय चर्चा नाही ? एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कुणाची? या प्रश्नावरुन ठाकरे व शिंदे गट आमने सामने आले आहेत. सुरुवातीला अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गटातर्फे लढली जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मागील निवडणुकांत अपक्ष उमेदवार असूनही दुसऱ्या क्रमांकाची मते खेचणाऱ्या मुरजी पटेलांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे शिंदे गटाने ही जागा भाजपला सोडली. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिंदेगटाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जगदीश कुट्टी हे, अपक्ष उमेदवार मुरजी पटेल नंतर तिसऱ्या नंबर वर राहिले असून त्यांना तब्बल २७ हजार ९५१ मतं भेटली होती. म्हणून आता मनसेचा पाठिंबा मिळाल्यास भाजपला या निवडणुकीत अधिकचं बळ मिळणार आहे. त्यामुळे भाजपकडून राज ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. भेटीनंतर आशिष शेलार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज ठाकरेंसोबत ही केवळ सदिच्छा भेट झाली. भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असेही म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.