मुंबई - बॉक्सिंग विकासासाठी महत्वपूर्ण योजना आणून बॉक्सिंग, खेळाडू तसेच खेळाचा विकास करणार असल्याचे आश्वासन भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व भाजपा आमदार आशिष शेलार आता राजकारणासोबतच बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. या निवडणुकीत सुद्धा आपणच जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे माजी क्रीडा मंत्री असल्याचा अनुभव आपल्या पाठीशी असल्याचे शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बॉक्सिंग प्रशासन सुस्त असून खेळाडूंचे मानधन सुद्धा फारच कमी असल्याचे यावेळेस एफबीआयचे संस्थापक सदस्य असित बॅनर्जी यांनी सांगितले. यासोबत प्रयोजक आणून बॉक्सिंगला जागतिक स्तरावर मोठे स्थान प्रदान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळेस आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.