मुंबई : शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनातून वारंवार भाजपवर टीकास्त्र ( Shiv Sena has repeatedly criticized the BJP from samana ) सोडले जात आहे. अशातच आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार ( Mumbai BJP President Ashish Shelar ) यांनी शिवसेनेवर जहरी टीका करणारे पत्र काढले आहे. या पत्रात त्यांनी सध्या राज्यात मुंबईत ज्या पद्धतीने उत्सवाची धूम सुरू आहे ते उत्सव बघता शिवसेनेच्या पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. असे सांगत, त्यांना आमचा एकच सल्ला मग घ्या ना धौती योग अशी जहरी टीका केली आहे.
काय म्हटले आहे पत्रात ? शिवसेनेवर टीका करताना आशिष शेलार म्हणतात की, ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली, ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे. हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून ते जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला मग घ्या ना धौती योग.
थापा मारणाऱ्यांकडे आता, थापाही राहिला नाही ? पुढे आशिष शेलार म्हणतात की, भाजपा दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करीत आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे करुन दाखवले असे होर्डिंग लावले नाहीत. पण जेव्हा आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता थापा पण राहिला नाही आणि उत्सवही. यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली.
पेंग्विन सेनेला एवढा त्रास का झाला ? आशिष शेलार पुढे म्हणतात की, गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच! अहंकार, गर्व हरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय, राजकीय वाद काढून क्लेश करुन तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत त्यांच्यासाठी अंबे माते तुझ्या चरणी एकच प्रार्थना -
प्रसन्नवदनें प्रसन्न होसी निजदासा ।
कलेशांपासुनी सोडवी, तोडी भवपाशा ||