ETV Bharat / city

वरळी मतदारसंघात उमेदवार धनुष्यबाणाचाच असेल - आशिष चेंबूरकर

author img

By

Published : Jul 25, 2019, 5:46 PM IST

सचिन अहिर यांनी विधानसभा निवडणुकपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वरळी मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील शिंदे, आशिष चेंबूरकर की स्वतः आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार यावर चर्चा सुरू झाली आहे.

वरळी मतदारसंघात उमेदवार धनुष्यबाणाचाच असेल - आशिष चेंबूरकर

मुंबई - सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला चेहरा मानला जात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे शिवसेनेत जाणे हा राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. तसाच हा धक्का अहिर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले सुनील शिंदे आणि आशिष चेंबूरकर यांच्यासाठी देखील आहे. कारण अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने वरळी मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अहिर यांच्या प्रवेशाबाबत चेंबूरकरांची प्रतिक्रिया

शिवसेनेचे वरळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाचं स्वागत केलं आहे.अहिर यांच्या पक्ष प्रवेशासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्हाला मान्य आहे. सचिन अहिर यांना शिवसेनेची विचारधारा पटली, म्हणून ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असं आशिष चेंबूरकर म्हणाले. अहिर यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे वरळी मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील शिंदे, आशिष चेंबूरकर की स्वतः आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर कोणतीही चर्चा झाली नाही असे अहिर म्हणाले. मात्र शिवसेनेचे वरळी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी वरळी मतदारसंघात उमेदवार धनुष्यबाणाचाच असेल, असे सांगितले आहे.

सचिन अहिर हे राष्ट्रवादीकडून वरळी विधानसभा निवडणूक लढवत होते. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून आशिष चेंबूरकर यांना तिकीट देण्याची चर्चा होती. कारण 2009 च्या निवडणुकीत आशिष चेंबूरकर यांनी विधानसभा लढत सचिन अहिर यांना कडवी लढत दिली होती. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अहिर यांचा शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांनी पराभव केला. तेव्हापासून सचिन अहिर विरुद्ध आशिष चेंबूरकर असं चित्र वरळी परिसरात नेहमीच पाहायला मिळत आहे.

Intro:मुंबई - माजी गृहनिर्माण राज्यमंत्री व राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. सोडचिठ्ठी देताना आणि शिवबंधन बांधताना माझ्या ह्रदयात शरद पवार आहेत तर शरीरात राजकीय बळ देणारे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. पण मी राष्ट्रवादीला संपवणार नाही तर शिवसेनेला वाढवणार असे अहिर म्हणाले.Body:सचिन अहिर यांनी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पण सचिन अहिर हे राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष पदावरून पाय उतार होणार आणि अमोल कोल्हे यांची वर्णी लागणार होती, हे उघडपणे अजित पवार यांनी बोलून दाखवले होते. हेच कारण सचिन अहिर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत असलं तरी आपण उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विकास धोरणामुळे मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे अहिर यांनी म्हटले.
सचिन अहिर यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे वरळी मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील शिंदे, आशिष चेंबूरकर की स्वतः आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर कोणतीही चर्चा झाली नाही असं अहिर म्हणाले. मात्र शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार म्हणतायत की वरळी मतदारसंघात उमेदवार धनुष्यबाणाचाच असेल.Conclusion:सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीला खंडार पडले , मात्र आता राष्ट्रवादीची मोठी वेटिंग लिस्ट शिवसेना पक्ष प्रवेशच्या वाटेवर आहे. यात संग्राम जगताप, भास्कर जाधव,पंकज भुजबळ यांची नाव घेतली जात आहेत. या राष्ट्रवादीतील इन्कमिंग मुळे शिवसेनेला नेमका किती फायदा होईल हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व बंडखोरीवरून दिसून येईल.
बाईट आशिष चेंबूरकर
बाईट यात अलपेश ने पाठवलेलं सुनील शिंदे व सचिन अहिर यांचा बाईट वापरणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.