ETV Bharat / city

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त चर्चगेट स्टेशनमध्ये दुमदुमला मृदुंगाचा नाद - Devotion to Vitthal

मुंबईमध्ये आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Ekadashi ) पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट या स्थानकामध्ये ( Churchgate station on the Western Railway ) शेकडो वारकऱ्यांनी ( Warakari ) टाळ, मृदुंग, भजन कीर्तन करत विठ्ठलाच्या भक्तीत ( Devotion to Vitthal ) रंगून गेलेले पाहाव्यास भेटले

Ashadi Ekadashi
आषाढी एकादशीनिमित्त चर्चगेट स्टेशनमध्ये दुमदुमला मृदुंगाचा नाद
author img

By

Published : Jul 10, 2022, 4:24 PM IST

मुंबई - आषाढी एकादशी निमित्त ( Ashadi Ekadashi ) पंढरीत विठ्ठलाच्या भक्तीचा महासागर लोटला असताना दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा ठीक ठिकाणी भाविक विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसून येत आहेत. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट या स्थानकामध्ये ( Churchgate station on the Western Railway ) शेकडो भक्तांनी टाळ, मृदुंग, भजन कीर्तन करत विठ्ठलाच्या भक्तीत ( Devotion to Vitthal ) रंगून गेल्याचे बघायला भेटले.

आषाढी एकादशीनिमित्त चर्चगेट स्टेशन दुमदुमले

चर्चगेट स्थानकात विठू नामाचा गजर - मागील दोन वर्षे करोनामुळे विठ्ठल भक्तीत बाधा आली असल्याकारणाने तमाम भक्त विठ्ठलाच्या भक्तीत टाळ, मृदुंग, कीर्तन, भजन यात रंगून जाण्याची वाट बघत होते. यंदा करोनाच सावट दूर झाल असल्याकारणाने एकीकडे लाखोच्या संख्येने वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले असले, तरी मुंबईत सुद्धा ठीक ठिकाणी विठू नामाचा गजर करताना भाविक दिसत आहेत. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकात संत सेवा समिती द्वारे विठू नामाचा गजर करण्यात आला. जवळपास १५० भजन मंडळी मुंबई भरातून इथे दाखल झाली होती. या भजन मंडळींची सुरुवात मालाड पासून होऊन बोरवली ते चर्चगेटला आले. याची सांगता पुन्हा परतीच्या मार्गावर दहिसर येथे भजन कीर्तनाने होणार आहे.

रेल्वे प्रवासात भजन कीर्तनावर बंधन नको - याप्रसंगी बोलताना श्री. संत सेवा समितीचे कार्यकारी योगेश सावंत म्हणाले की, ही सर्व भजन मंडळी एक मोती आहे. त्यांना एका माळेत गुंफवायच काम संत सेवा समितीने केले आहे. आम्ही रेल्वे प्रवासादरम्यान भजन कीर्तन गातो, त्यावर रेल्वेकडून आमच्यावर कारवाई केली जाते. परंतु आमची अशी अपेक्षा आहे की ज्या कोणाला या भजन, कीर्तनाचा त्रास, होत असेल तर त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा. आम्ही त्यांच्या तक्रारी दूर करू. मागील दोन वर्षापासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. करोनामुळे भक्ती सागरामध्ये बाधा निर्माण झाली होती. आज दीडशेच्या वर पालख्या येथे उपस्थित आहेत. हा उत्साह ओसंबून वाहताना आपणाला दिसत आहे.

शरीराने मुंबईत मनाने पंढरीत - 'पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला हा सखा मायबाप,' या अभंगाप्रमाणे भाविकांची विठ्ठल दर्शनाची तृष्णा पूर्ण होत आहे. गेली दोन वर्षे करोनामुळे आपल्याच घरी राहून विठ्ठल भक्ती करत असलेले भावी आता टाळ, मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले पहावयास भेटत आहेत. करोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी यंदा साऱ्यांची शरीर पंढरीच्या दिशेने धावली नसली तरी त्यांचे मन पंढरीच्या भक्तीत तल्लीन झाले आहे.

हेही वाचा - Vitthal Mahapuja By CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तीन पिढ्यांसोबत विठ्ठलाची शासकीय महापूजा, ... हे घातले साकडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.