ETV Bharat / city

Ashadi Ekadashi : एसटी महामंडळातर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन, परिवहन मंत्र्यांच्या सूचना - परिवहन मंत्री अनिल परब

आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Ekadashi ) राज्यभरातून पालख्या, वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना ( Warkari Pandharpur ) होत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एसटी महामंडळाने ( ST Corporation ) पंढरपूरात आरोग्य शिबिर आयोजित करावे. तसेच वारकऱ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे ( Warkari given pure water) असे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांनी दिले.

ST Corporation
एसटी महामंडळ
author img

By

Published : Jun 18, 2022, 9:53 AM IST

मुंबई - आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Ekadashi ) राज्यभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना ( Warkari Pandharpur ) होत असतात. वारकऱ्यांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एसटी महामंडळाने ( ST Corporation ) आरोग्य शिबिर आयोजित करावे. तसेच वारकऱ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे ( Warkari given pure water) असे, निर्देश परिवहन मंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांनी दिले. यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची परिवहन मंत्री परब स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 17 जूनला सायंकाळी मंत्रालयात पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी परब म्हणाले, पंढरपूर यात्रेदरम्यान ( Pandharpur Yatra ) एसटी प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे वारकरी, तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यत घेऊन जाणे त्याचबरोबर विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूप गावी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणे एसटी महामंडळाचे काम आहे असे परब यांनी म्हटले.

हेही वाचा -PM Modi Mother Birthday : आईचे पाय धुवून पंतप्रधान मोदींनी घेतले आशीर्वाद.. वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

भरपावसात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालत येतात. त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे. पंढरपूर येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर शिबिर आयोजित करावे, यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास तातडीने पर्यायी बसेसची व्यवस्था करावी. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही परब यांनी बैठकीत दिले.

आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य नागरिक पंढरपूरकडे रवाना होत असतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे. नागरीकांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांना त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था करावी असेही परिवहनमंत्री परब यांनी सांगितले.

हेही वाचा - Maharashtra Monsoon Updates : सोमवारपासून राज्यभरात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा.. मॉन्सून होणार सक्रिय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.