मुंबई - Asha Bhosle Birthday भारतीय संगीत क्षेत्राला लाभलेली अनमोल देणगी म्हणुन मंंगेशकर परिवाराकडे ( Mangeshkar family ) पाहिले जाते. याच कुटुंंबातील एक बहुमोल हिरा म्हणुन आशा भोसले यांंच्याकडे पाहिले जाते. आज आशा भोसले यांंचा वाढदिवस आहे. ८ सप्टेंबर, १९३३ रोजी त्यांंचा सांंगली मध्ये जन्म झाला होता, आज त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षात ( Asha Bhosle 89th Birthday ) पदार्पण केले आहे. या खास प्रसंगी आशा भोसले यांनी आज मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे ( Darshan of Siddhivinayak ) दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली आहे.
लता दीदींची आठवण सदैव? - विशेष म्हणजे दरवर्षी त्यांंच्या वाढदिवसानिमित्त ( Asha Bhosle Birthday ) त्यांना आवर्जून शुभेच्या देणाऱ्या त्यांच्या दीदी भारत रत्न गानकोकिळा लता मंंगेशकर ( Gankokila Lata Mangeshkar ) यावर्षी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या जगात नसल्याने नक्कीच त्याचे दुःख आशा भोसले यांना आहे. मागच्या वर्षी आपल्या धाकट्या बहीणीसाठी सोशल मीडियावर एक जुना फोटो पोस्ट करत लता दीदींनी अगदी सुंंदर आणि साध्या शब्दात आशा भोसले यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले होते.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित - आपल्या सुमधुर गायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी दिग्गज गायिका आशा भोसले ( Legendary singer Asha Bhosale ) यांचा आज ८९ वा वाढदिवस आहे. दरवर्षी आशाजी त्यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करतात. संपुर्ण कुटुंब एकत्र येऊन आशाजीसांठी हा दिवस अविस्मरणीय रित्या साजरा करत असतात. परंतु यंदा या दिवशी त्यांना लता दिदिंची कमी आहे. अगदी बालपणापासूनच आपल्या बहिणीप्रमाणे आशाजींना सुद्धा गायनाची प्रचंड आवड होती. त्यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून गायनास सुरुवात केली. १९ व्या शतकातील लोकांपासून ते आजच्या फॉरर्वड जनरेशनपर्यंत्न आशाजींच्या गाण्याची जादू कायम आहे.
संगिताच्या जगतामध्ये आशा ताईंनी भली मोठी कामगिरी केली आहे. आजतागयत त्यांनी २० भाषामध्ये १६ हजारांहून अधीक गाणी गायली आहेत. आणि यामुळे सर्वाधीक स्टूडिओ रेकॉर्डिंगसाठी त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांना तब्बल दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्काराने ( Dadasaheb Phalke Award ) गौरवण्यात आले आहे. तसेच सातवेळा फिल्म फेयर पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आज आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन. दिवसाची सुरुवात केली आहे.