मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी रात्री उशिरा ईडीने अटक केली. या घटनेनंतर भाजप नते किरीट सोमैय्या यांनी रात्री 2:30 च्या सुमारास ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सोमैया म्हणतात, 'अखेर अनिल देशमुख यांना अटक झाली आह. १०० कोटी रुपयांचा हा आर्थिक गैरव्यवहार आहे. दरम्यान, या १०० कोटींच्या वसुलीपैकी किती पैसे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खात्यात गेले, हेही आता उघड होईल आसा घणाघातही सोमैया यांना यावेळी केला आहे."
मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो आहे
ईडीच्या अटकेच्या कारवाईपूर्वी देशमुख यांनी एक निवेदन प्रसिद्धिस दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपानंतर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य केले. मला पाठवलेल्या समन्सलाही मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो आहे असही ते म्हणाले आहेत.
![किरीट सोमैया यांचे ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-mh-mum-mh100_02112021032807_0211f_1635803887_1059.jpg)
...याचाही विचार व्हायला हवा
मा. उच्च न्यायालयाने मला सांविधानिक हक्कांतर्गत विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहून पुढील चौकशीस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले ४ महिने बेपत्ता आहेत, यातूनच त्यांच्या आरोपांतील खोटारडेपणा समजतो आहे. त्यांच्यावरही अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. याचाही विचार व्हायला हवा, असही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - नवाब मलिक-देवेंद्र फडणवीसांमध्ये कलगीतुरा; पाहा, मलिकांच्या गंभीर आरोपांवर काय म्हणाले फडणवीस?