ETV Bharat / city

Shivaji Maharaj Statue Defacement : सत्व  आणि तत्व आम्ही सोडले...शिवसेनेची भाजपवर टीका - Basavraj on bengluru incident

आधी बोम्मईंचा (Basavraj Bommai) राजनीमा घ्या आणि मगच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत (Shivaji Maharaj Statue Defacement) असल्याचे दाखवा. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बोम्मईंचा राजीनामा घेण्याची मागणी करणारे पत्र घराघरातून जाऊ द्या, अशी टीका शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी केली.

arwind sawant
अरविंद सावंत
author img

By

Published : Dec 19, 2021, 5:34 PM IST

मुंबई - कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेचे (Shivaji Maharaj Statue Defacement) राज्यात आज तीव्र पडसाद उमटले. सर्वत्र या घटेनेप्रकरणी संताप व्यक्त केला जातो आहे. भाजपने मात्र, मौनव्रत धारण केल्याने शिवसेनेने भाजपला चांगलेच फैलावर घेतले आहे. भाजपची बोबडी वळली का, जेव्हा देशाच्या देवाचा अपमान होतो. तेव्हा चंपा असो वा डंपा कोणीच बोलत नाही, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता (Arvind Sawant on Chandrakant Patil) केली. तसेच कर्नाटकात भाजप सत्तेवर असून दोषींवर कठोर कारवाई करावी. तेथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली.

मूळ स्वभावावर येऊ देऊ नका
कर्नाटक राज्यात भाजपचे सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची येथे विटंबना (Shivaji Maharaj Statue Defacement) करण्यात आली. मुख्यमंत्री बसवराज यांनीही छोटीशी घटना असल्याचे वादग्रस्त विधान केले. या सर्व घटनांचे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेनेही यावरून आक्रमक भूमिका घेत, मुंबईसह राज्यभरात निदर्शने केली. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी निषेध करत, संताप व्यक्त केला. 'देशात देवांचा अपमान होतो आणि कोणतीच कारवाई होत नाही. या घटनेवर चंपा असो वा डंफा कोणीच बोलत नाहीत. कानडी बांधवांनो, तुम्ही महाराष्ट्रात राहता. इथे तुम्हाला त्रास होत नाही. शाळा बंद केल्या जात नाहीत. तेथील सरकारला सांगा अन्यथा महाराष्ट्रात राहणे तुमचे कठीण होईल, असा सज्जड इशारा सावंत यांनी दिला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे धगधगता अग्नी आहेत. त्यांचा अवमान झाल्यावर सर्वांचीच बोबडी वळली आहे, असे सांगत सावंत यांनी भाजप नेत्यांचा देखील यावेळी खरपूस समाचार घेतला. सत्व आणि तत्त्व आम्ही सोडले नाही. आम्हाला आमचा मूळ स्वभावावर यायला देऊ नका,' असा इशारा ही यावेळी दिला.

बोलतील एक आणि करतील दुसरेच
भाजपची लोक बोलतील एक आणि करतील दुसरेच. केवळ राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव घेतात. पंतप्रधानांनी काशीतील कार्यक्रमात शिवाजी महाराजांचे नावे घेतले. त्यांनी आधी बोम्मईंचा राजनीमा घ्या आणि मगच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असल्याचे दाखवा. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बोम्मईंचा राजीनामा घेण्याची मागणी करणारे घराघरातून पत्र जाऊ द्या. पेटून उठा हेच शिवसेनेने शिकवले आहे, असेही सावंत म्हणाले. तसेच मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षावर शाई फेकली. तिच शाई महाराजांवर फेकली. आता ही लोक दरवाजावर येतील. काळजी घ्या, असेही आवाहनही जनतेला केले.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील बंगळुरु येथे शुक्रवारी रात्री उशिरा संभाजी सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना (Shivaji Maharaj Statue Defacement) करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या (Basavraj Bommai) यांनी अशा पद्धतीच्या छोट्या घटना होतच असतात असं वक्तव्य केल्याने शिवसैनिक अजूनही संतापले आहेत. या प्रकारामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्याचसोबत या प्रकराची तीव्र निषेध विविध ठिकाणी आता केला जात आहे.

हेही वाचा - Shivsena Vs BJP In Mumbai: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर शिवसेना - भाजप कार्यकर्ते भिडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.