मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. मात्र मूळ शिवसेनेवर दाव्या करणाऱ्या शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार की शिवसेनेचा यावरील निर्णय अद्याप बाकी आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले. (Arvind Sawant has reacted Dussehra Gathering) शिवाजी पार्कवर पहिली गर्जना आम्ही दिली, त्यामुळे शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परंपरा आमची आहे. शिवसेनेच्या निर्मितीनंतर शिवाजी पार्कवर पहिला मेळावा मूळ शिवसेनेचा झाला. यानंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या. बाळासाहेब यांचे स्मृथीस्थळ देखील तिथेच आहे. त्यांनी त्याच मैदानावरून आव्हाने दिली पण आमचा मेळावा थांबला नाही आणि सोन लुटणे सुरुच राहिले. आताही शिवतीर्थावर मेळावा होईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात अनेक ठिकाणी दंगे झाले, त्यांनी सगळ्यांनी सोबत घेतलं आणि ते पुढे गेले. हिंदुत्व आम्ही कधीही सोडले नाही. ९७ ला हिंदुत्वविरोधात तुम्ही आमच्याशी लढले, तेव्हा भाजप कुठे होत? २०१४ साली युती का तोडली? २०१४ विधानसभेचा विश्वासदर्शक ठराव केला त्यावेळेला शरद पवार यांनी मदत केली तेव्हा कुठे गेले होते हे? सगळे आयुष्य कटकारस्थान करत आहेत, अशी जहरी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे चाललो आहोत, त्यांनी कोणतीही आडकठी करू नये, भाजपच्या मनात हा खरा डाव आहे, उद्धव ठाकरे यांनी तो ओळखून संयमाने हा सगळा काळ सोसला आहे. जाणीवपूर्वक भाजपने प्रसंग निर्माण केला, यात दोन आजी माजी शिवसैनिक सामोर येतील आणि ते भिडतील असे भाजपचे स्वप्न होते, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला. तसेच आताचे राजकरण लोकांना आवडत नाही आणि हे दिसून येत असल्याचे अरविंद सावंत म्हणाले
बाळासाहेब ठाकरे नक्की बघत असतील की मी कसा गद्दारांना जन्म दिला आहे. केशवराव भोसले यांना भेटा आणि मग बघा. वाटेल त्या थापा मारायच्या. किती वर्ष सत्तेवर होते ते बघा. हे पवार साहेब यांच्या सोबत फिरायचे. रामदास कदम कसले निष्ठावंत, दापोली खेडमध्ये तुम्हाला लोकांनी हरवले. विधानसभेत शिवसेनेमुळे तुम्ही होता, यांचे क्रिमिनल रिपोर्ट काढा. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या विरोधात पुरावे काढले. किरीट बोलले आमच्याकडे आले आता सगळे साफ झाले, चारही स्तंभ हलत आहेत, आणि सत्ताधारी त्यांचा आता वापर करत आहेत, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
निवृत्त न्यायमूर्ती रामणा जाताना माफ करत म्हणाले. न्यायमंडळ कायदा करणार मंडळ आहे, सत्य लपवू नका. सगळ्यांना प्रश्नांना कसे भरकटवायच हे या सगळ्यांना बरोबर माहित आहे. जर कोर्टाने आमचा अर्ज फेटाळला तर आमचे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेईल. शिवसेना टिकाऊ आहे विकाऊ लोकांचा बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.