मुंबई - मराठी भाषा दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत लोककलावंत आणि वकील यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात मराठी ही बोललीच गेली पाहिजे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. कारण की, भाषेशी अनेक गोष्टी निगडित आहे. मराठी लोककला ही लोप पावत चालली आहे. याबाबतही शासनाने उपाययोजना केली पाहिजे. त्यांना व्यासपीठ उपलब्ध केले पाहिजे. लोककलेच्या माध्यमातून अनेक वर्षे लोककलावंतांनी भारुड, गोंधळ, पोवाडा, अभंग यांच्या माध्यमातून मराठी जगवली आहे. महाराष्ट्रात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, असे मत लोकशाहीर विठ्ठल उपम यांचा मुलगा संदेश उमप यांनी व्यक्त केले.
आज मराठी दिन आहे. यानिमित्ताने अनेक ठिकाणी कार्यकम आहेत. मात्र, हे कार्यक्रम फक्त आजच्या दिवस न राहता वर्षभर राबिबले पाहिजे. जेणेकरून मराठी भाषेची माहिती इतर भाषिकांना सुद्धा होईल. जर मराठी शाळा आधुनिक झाल्या तर नक्कीच पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत टाकण्याचा विचार करतील, असे ऍड. दिलीप इनकर यांनी सांगितले.