मुंबई - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने 2021 च्या पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. मात्र राज्यसेवा परीक्षेअंतर्गत 290 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आजपासून (मंगळवार) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 2 जानेवारी 2022 रोजी या परीक्षेच्या पूर्व पर आयोजन करण्यात येणार आहे.
2 जानेवारी 2022 ला पूर्व परीक्षा -
राज्यसेवा आयोगाच्या 2021 च्या पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आले असून, आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. 16 संवर्गात ही भरती होणार आहे. 2 जानेवारी 2022 ला पूर्व परीक्षा होणार असून 7, 8 आणि 9 मे 2022 ला मुख्य परीक्षाचे आयोजन असणार आहे.
25 ऑक्टोबर रोजी शेवटीची तारीख -
या परीक्षांसाठी आजपासून (5 ऑक्टोबर) अर्ज करता येणार असून अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 544 रुपये तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 344 रुपये एवढी फी असणार आहे.
कोणत्या विभागात किती पदांची भरती?
- उपजजिल्हाधिकारी - 12
- पोलीस उपअधीक्षक - 16
- सहकार राज्य कर आयुक्त - 16
- गटविकास अधिकारी - 15
- सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ - 15
- उद्योग उप संचालक - 4
- सहायक कामगार आयुक्त - 22
- उपशिक्षणाधिकारी - 25
- कक्ष अधिकारी - 39
- सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी - 4
- सहायक गटविकास अधिकारी - 17
- सहायक निबंधक सहकारी संस्था - 18
- उपअधीक्षक भूमि अभिलेख - 15
- उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क - 1
- उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क - 1
- सहकारी कामगार अधिकारी - 54
हेही वाचा - MPSC : विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ट्विटर हँडल सुरू