मुंबई - कोरोना संक्रमनामुळे मुंबई पोलीस खात्यातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनामुळे 8 पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यात मुंबई पोलीस खात्यातील 5 , नाशिक , पुणे , सोलापूर येथील प्रत्येकी 1 पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोना थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी रस्त्यावर 24 तास उभे राहून करणाऱ्या राज्यातील तब्बल 1007 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात तब्बल 106 पोलीस अधिकारी असून 901 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यातील विविध ठिकाणीं उपचार घेत असलेले 113 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 15 पोलीस अधिकारी व 98 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 887 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 91 पोलीस अधिकारी व 796 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.