ETV Bharat / city

सीएसएमटी-कुर्ला स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना निनावी फोन; आरोपीला जबलपूर येथून अटक - सीएसएमटी-कुर्ला स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला असल्याच्या धमकीचा निनावी फोन पोलिसांना आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर रेल्वे स्थानकावर संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. परिणामी आरोपीला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव जितेश रमाकांत ठाकूर आहे.

bomb planted at CSMT-Kurla station
bomb planted at CSMT-Kurla station
author img

By

Published : Jan 8, 2022, 3:10 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला असल्याच्या धमकीचा निनावी फोन पोलिसांना आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर रेल्वे स्थानकावर संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. परिणामी आरोपीला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव जितेश रमाकांत ठाकूर आहे. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला मुंबईत आणले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

तपासणी काहीही आढळून आले नाही -

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवा बॉम्बेने उडवून देण्याच्या धमकीचा निनावी फोन आलेला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती. अशा प्रकारचे वारंवार फोन येत असल्यामुळे पोलिसांनी सुद्धा आता चांगलीच कंबर कसली आहे. गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आलेला होता. त्यानंतर या कॉलरशी संपर्क साधण्यात आला. सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या फोनची माहिती सर्व यंत्रणा देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस, आरपीएफ, बॉम्बे शोधक आणि निकामी पथक, श्वान पथकाद्वारे तपासणी मोहीम सुरू केली. मात्र तपासणीदरम्यान रेल्वे स्थानकावर संशयास्पद काहीही आढळून आलेला नाही. सध्या लोहमार्ग पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

हे ही वाचा - Assembly Election 2022 : निवडणूक आयोग आज जाहीर करणार 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख

लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू -

मिळालेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलिसांनी कॉलरशी संपर्क साधला असता हा आरोपी मध्यप्रदेशातील जबलपूर येथील असल्याचं समझले. तेव्हा पोलिसांनी लगेच आपलं पथक जबलपूरला पाठवत आरोपीला अटक करून मुंबईत आणले आहे. आरोपीचे नाव जितेश रमाकांत ठाकूर आहे. सध्या आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.