मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्यात अनिल परब यांची ढवळाढवळ वाढली आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
पवारांनी मुख्यमंत्र्यांची काढली होती समजूत -
पोलिसांच्या बदल्या करण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या बदलीच्या अध्यादेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी स्थगिती दिल्याचे प्रकरण उघड झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांची समजूत काढली होती. मात्र आता पुन्हा एकदा पोलीस खात्यात शिवसेनेचे हस्तक्षेप वाढल्याचे समोर येत आहे.
शरद पवार यांच्याकडे तक्रार-
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी एनआयने अटक केली आहे. इतरही अधिकाऱ्यांना एनआयएने चौकशीसाठी बोलावले आहे. राज्य सरकारची यामुळे डोकेदुखी वाढली आहे. मात्र, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांचा गृहखात्यात हस्तक्षेप सुरू आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
हेही वाचा- बापरे! राज्यात बुधवारी 23 हजार 179 नवे कोरोनाग्रस्त