ETV Bharat / city

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर सकारात्मक चर्चा करू - अनिल परब यांचे आश्वासन - etv bharat marathi

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांच्या मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनसाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पुर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केल्याचे परब यांनी सांगितले आहे.

अनिल परब
अनिल परब
author img

By

Published : Nov 3, 2021, 10:25 PM IST

Updated : Nov 3, 2021, 10:42 PM IST

मुंबई- ऐन दिवाळीत सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि अन्य मुद्द्याबाबत दिवाळीनंतर शासकीय स्तरावर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांच्या मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनसाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पुर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता व दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनासोबत देण्यात आल्याचे मंत्री परब यांनी दरेकरांना सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर सकारात्मक चर्चा करू

हेही वाचा-किळसवाणं.. फ्रुट बियरमध्ये ड्रेनेजच्या पाण्याचा वापर, सोलापुरातील प्रकार

कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नका-

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारचे व परिवहन मंत्री यांचे आभार मानले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वर कोणतीही कारवाई करु नका, अशी विनंतीदेखील त्यांनी परिवहन मंत्र्यांना केली. या बाबतीत बोलताना मंत्री परब म्हणाले की, आजअखेर अघोषित संपावर असलेल्या कोणते कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही. तसेच तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे व सर्व सामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा-संपातील एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा; आज रात्रीपर्यंत कामावर हजर न झाल्यास कारवाई

Last Updated : Nov 3, 2021, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.