मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार माजी आमदार अनिल गोटे यांनी ईडीकडे केली ( Anil Gote Lodge Complaint ED ) आहे. जयकुमार रावल पर्यटन मंत्री ( Former Minister Jaykumar Rawal ) असताना मुंबई फेस्टिवल नामक कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचे 1 वर्षाचे टेंडर 5 वर्षाचे करत काही अधिकाऱ्यांना पर्यटन विभागात आणले आहे. देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचाराविरोधात बोलायचा अधिकार नाही. फडणवीसांना भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले आहे, असा आरोपही अनिल गोटे यांनी केला आहे.
ईडी कार्यलयातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल गोटे म्हणाले की, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून देणगी घेतली आहे. मागील आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही. याप्रकरणाची तक्रार मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे करणार असल्याचेही अनिल गोटे यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा दर आठवड्याला भ्रष्टाचार उघड करणार आहे. प्रत्येक आठवड्याला एका मंत्र्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचेही अनिल गोटी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Goa Election 2022 : सुदिन ढवळीकरांचा मुख्यमंत्री पदावर दावा; चिदंबरम यांच्याशी केली चर्चा