मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डिफॉल्ट जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. (11 जानेवारी) रोजी मुंबई सत्र न्यायालयात दोन्ही पक्षकारांच्या युक्तिवाद पूर्ण झाला. (Anil Deshmukh bail will be decided by Mumbai Sessions Court today) त्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवत 18 जानेवारी रोजी निकाल (Anil Deshmukh bail) देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. (Anil Deshmukh bail plea) दरम्यान, आज न्यायालय अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करते की जेलमध्ये अनिल देशमुख यांचा मुक्काम वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशमुख यांचे वकील विक्रांत चौधरी आणि अनिकेत निकम यांनी उत्तर
ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी अनिल देशमुख यांना जामीन देण्यात येऊ नये तसेच जामीन मागण्यासाठी केलेला अर्ज अवैध असल्याचे देखील युक्तिवाद केला होता. या युक्तिवादाला अनिल देशमुख यांचे वकील विक्रांत चौधरी आणि अनिकेत निकम यांनी उत्तर देत अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद केला होता. आज मुंबई सत्र न्यायालय अनिल देशमुख यांच्या याचिकेवर फैसला देणार आहे.
जामीन अर्जा अवैध ईडीचे प्रतिज्ञापत्र
अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला असून अनिल देशमुख यांनी दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज हा अवैध असल्याचे ईडीने सत्र न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. ईडीच्या म्हणण्याप्रमाणे 60 दिवसाच्या आत आरोप पत्र चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मागता येणार नाही असे ईडीने मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत
100 कोटी कधी प्रकरणात अनिल देशमुख यांना तिकडून अटक करण्यात आली होती. तब्बल बारा तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच, अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांची पत्नीचा भाऊ यांना देखील सहा आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
ऋषिकेश देशमुख फरार घोषीत
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषीत केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र, याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हेही वाचा - Sanjay Raut on BJP: संजय राऊत म्हणाले... 'सगळीच येड्यांची जत्रा, ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो'