मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख राज्य सरकारकडून स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगासमोर हजर झाले आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे कुटूंबही आहे. या आयोगासमोर काल परमबीर सिंग यांची चौकशी झाली. आतापर्यंत माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे, देशमुखांचे यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांची पण चौकशी झालेली आहे.
असे आहे प्रकरण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. विशेष न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यांची 13 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. शंभर कोटी वसुली प्रकरणात ईडीने चौकशी करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाची कोठडी देण्यात आली आहे. परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर ईडीकडून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी संजीव पलांडेंनी दिली होती अनिल देशमुखांना यादी!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पलांडे ( Anil Deshmukh's Secretary Sanjeev Palande ) यांनी ईडीला ( Directorate of Enforcement ) दिलेल्या जबाबाचे हवाला देत मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, सहायक पोलीस आयुक्त किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या ( Transfers of Senior officers Case ) करण्यासाठी तसेच त्यांना तैनातीच्या उद्देशाने एक यादी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवली, असल्याची कबुली संजीव पलांडे यांनी जबाबात दिली आहे, अशी माहिती ईडीने न्यायालयात दिली आहे.
ऋषिकेश देशमुखची सक्रियता, ईडीचे प्रतिज्ञापत्र!
मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा (Anil Deshmukh) मुलगा ऋषीकेश देशमुखचा सक्रिय सहभागी असून वडिलांनी मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED)वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला आहे.
हे ही वाचा : Param Bir Singh : परमबीर सिंग यांची सीआयडीकडून सलग 5 तास चौकशी