मुंबई: 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक झाली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता पुन्हा 27 डिसेंबर पर्यंत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. देशमुख यांना ईडीकडून 100 कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आली. ते 14 दिवस ईडी कोठडीत होते. त्यानंतर त्यांना 12 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने 29 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला होता आज 13 डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 27 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक झाली होती.
हेही वाचा: Sachin Waze cross examination - सचिन वाझेची अनिल देशमुखांच्या वकिलाकडून आज पुन्हा उलट तपासणी