मुंबई - मनसुख हत्या (Mansukh Hiren Murder Case) आणि अँटिलिया प्रकरणाबाबत ( Antilia bomb scare case ) एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित खंडणीबाबत केलेल्या आरोपींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून चांदीवाल समिती (Chandival Commission) नेमण्यात आली आहे. या समितीसमोर अनिल देशमुखांना शुक्रवार रोजी हजर करण्यात आले आहेत. चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर चांदीवाल आयोगाने सचिन वाझेंना परवानगी दिली. चांदीवाल आयोगासमोर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी केली जात आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चांदीवाल आयोग शासनाकडे आपला अहवाल सादर करणार आहे. आजचे कामकाज संपल्यानंतर आयोगाचे पुढील कामकाज सोमवार 24 जानेवारी रोजी पुन्हा सुरू होणार असून त्यावेळी सचिन वाझे पुन्हा अनिल देशमुख यांची उलट तपासणी करणार आहे.
सचिन वाझे यांच्याकडून अनिल देशमुख यांची उलट तपासणीतील प्रश्नोत्तरे
सचिन वाझे - खात्याची माहिती घेण्यासाठी किती कालावधी लागतो. किती दिवसात आपण हे सर्व समजून घेतलेत. ग्रहमंत्रालयात किती विभाग आहेत , उप विभाग आहे.
अनिल देशमुख - ग्रहमंत्रालय खूप मोठं आहे . Dg ऑफिस वेगळं आहे , acb वेगळं आहे , cid , होमगार्ड , अनेक विभाग वेगळे आहेत. पोलीस आयुक्तालय आदी भाग आहेत.
सचिन वाझे - चार्ज घेतल्या नंतर तुम्हाला कोणी खात्याची माहिती दिली , गृहमंत्री च कर्तव्य कोणी सांगितलं ?
अनिल देशमुख - खात्याचा चार्ज घेतल्या नंतर आपण माहिती घेतो. अभ्यास करतो . गृह मंत्रालयात 3 अतिरिक्त ची सेक्रेटरी आणि 1 प्रधान सचिव असतात.
सचिन वाझे - संजीव पालांडे यांना नेमणूक करण्यासाठी कोणाला सांगितल होत का ?
अनिल देशमुख - मला आठवत नाही. रेव्हेन्यू विभागातुन मी माहिती घेतली. त्यांच्या बाबत मी चांगलं ऐकलं होतं. त्यानंतर मी पालांडे यांना बोलावलं.
सचिन वाझे - केडर आणि नॉन केडर यात काय फरक आहे ?
अनिल देशमुख - मला माहित आहे.
सचिन वाझे - तुम्ही पोलीस इस्टेबलिशमेंट बोर्डाचे सदस्य होता का ?
अनिल देशमुख - मी सदस्य नव्हतो.
सचिन वाझे - तुम्हला कधी कळाल वाझे हे ciu चे प्रमुख झालेत ?
अनिल देशमुख - माझ्या कडे तक्रार आल्यात. सचिन वाझे यांना 14 ते 15 वर्ष सस्पेन्स केलं होतं. अशा अधिकाऱ्यांना पुन्हा खात्यात घेतलं. त्यात गुन्हे शाळेत दिल. लगेच दुसऱ्या दिवशी त्याला ciu दिल. एखाद्या निलंबित अधिकाऱ्यास परत घेतल्यास त्याला साईट ब्रांचला नियुक्ती केली जाते. त्यांना एक दिवस साईट ब्रांचला घेतलं. त्या नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी यांना क्राईम ब्रांच मध्ये घेण्यात आल. तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याना सुधाकर देशमुख ,विनय घोरपडे यांना डावलून सचिन वाझे यांना नेमण्यात आल्याची माझ्याकडे आली. सचिन वाझे याच्या नियुक्तीला तेव्हाचे जॉईंट सिपी संतोष रस्तोगी यांनी आक्षेप घेतला होता.
सचिन वाझे - api ची इंचार्ज म्हणून नियुक्ती होऊ शकत नाही , हे कोणत्या नियमानुसार आहे ?
अनिल देशमुख- नियम असेल म्हणूनच तर तेव्हाच्या जॉईंट सिपी ने आक्षेप घेतला होता.
सचिन वाझे - माजी सीपी परमबीर सिंग यांच्यावर गेल्या वर्षी ३० मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या जीआरचा भाग तुम्ही होता का ?
अनिल देशमुख - परमबीर यांनी त्यांच्या पत्रात केलेले आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मी मुख्यमंत्र्यांना चौकशी सुरू करण्याची विनंती केली.
सचिन वाझे - परमबीर सिग यांनी पत्र लिहलं त्यानंतर कमिटी बसली. त्यानंतर 30 मार्च 2021 ला gr काढण्यात आला. त्या दोन gr काढण्यात आलेत का ?
अनिल देशमुख - मला आठवत नाही.
सचिन वाझे - तुम्ही या 30 मार्च चा gr शी सम्बधित आहात का ?
अनिल देशमुख - सिंग च पत्र वाचल्यानंतर त्यात दिसलं , चुकीचं , राजकीय आरोप असल्याचं दिसत आहेत. हे मी cm साहेबाना सांगितलं या बाबत चौकशी करा त्यांनी चौकशी नेमली.
सचिन वाझे - मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांना अहवाल द्यावा असे म्हणणे योग्य आहे का ?
अनिल देशमुख - नियमावलीनुसार त्यांनी/तिने अहवाल द्यावा.
सचिन वाझे - जेटी सीपी मुंबईने सीपी, डीजीपी, एसीएस होम यांना अहवाल द्यावा?
अनिल देशमुख - जेटी सीपी मुंबईला सीपी रिपोर्ट करावा लागतो जेटी सीपी ते डीजीपीसाठी आवश्यक नाही.
सचिन वाझे -- एम.आर. हेमंत नागराळे हे सीपी मुंबई म्हणून नियुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्राचे डीजीपी होते
अनिल देशमुख - होय.
सचिन वाझे- तुम्ही कोणत्या नियमानुसार एपीआयला कोणत्याही युनिटचा प्रभारी म्हणून नियुक्त करता येत नाही ते सांगू शकाल का ?
देशमुख - संतोष रस्तोगी यांनी सांगितल्याप्रमाणे नियम असावा.
सचिन वाझे - तुम्हाला माझी नियुक्ती केव्हा कळली?
अनिल देशमुख - वाझे यांची 10 जून रोजी सीआययू प्रमुखपदी नियुक्ती झाली. आणि काही दिवसांनी मला तक्रार आली.
सचिन वाझे - तक्रार कोणी केली?
अनिल देशमुख - अनेक तक्रारी होत्या त्या तोंडी होत्या पण विभागाकडे लेखी तक्रारी आल्या असतील.
सचिन वाझे - तुम्हाला माहिती आहे का अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने अलिबागमध्ये आत्महत्या केली होती?
आयोग - प्रश्न संबंधित नाही म्हणून नाकारला.
सचिन वाझे - अन्वय नाईक यांची कन्या आधन्या नाईक हिने केलेल्या निवेदनावर आधारित, तुम्ही पुन्हा तपास केले?
अनिल देशमुख - त्या भेटल्या पण अधिक मला आठवत नाही.
सचिन वाझे -26 मे 2020 रोजी रात्री 8.04 वाजता तुम्ही ट्विट केले की अन्वय नाईकला अर्णब गोस्वामी कडून पैसे घ्यायचे होते त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले?
देशमुख - मी तपासून सांगतो.
सचिन वाझे - तुमचा फेरचौकशीचा आदेश CID आणि DG कडे पाठवण्यात आला होता, पण त्यांनी पुन्हा तपास करण्यास नकार दिला हे योग्य आहे का?
अनिल देशमुख - आठवत नाही
हेही वाचा - Antilia bomb scare case : आरोपी नरेश गौरच्या जामिनाविरोधात एनआयएची दोन सदस्य खंडपीठाकडे धाव