ETV Bharat / city

अनिल देशमुखांचा ईडीने घेतला ताबा; ऑर्थर रोड तुरुंगातून ईडी कार्यालयात आणले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ऑर्थर रोड तुरुंगातून ईडी कार्यालयात आणण्यात आले. अनिल देशमुख यांना ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.

अनिल देशमुखांना ऑर्थर रोड तुरुंगातून ईडी कार्यालयात आणले

author img

By

Published : Nov 8, 2021, 12:32 PM IST

Updated : Nov 8, 2021, 3:38 PM IST

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ऑर्थर रोड तुरुंगातून ईडी कार्यालयात आणण्यात आले. अनिल देशमुख यांना ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीच्या विरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. विशेष कोर्टाने EDची कोठडी नाकारल्यानंतर अनिल देशमुख यांना अर्थरा रोड जेलमध्ये पाठवण्यात आले होते. त्याविराेधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनवाई करत न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुखांना ऑर्थर रोड तुरुंगातून ईडी कार्यालयात आणले

शनिवारी विशेष न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली होती -

अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. देशमुख यांना शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने नकार देत देशमुख यांना 14 दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने देशमुख यांना दिलासा देत घरचे जेवण, औषधे आणि वकिलांना भेटण्याची मुभा दिली आहे. देशमुख यांच्यावतीने अ‍ॅड. अनिकेत उज्वल निकम आणि विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली होती.

12 नोव्हेंबरपर्यंत कोठडी -

यानिर्णयाच्या विराेधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनवाई करत न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांचे वकील अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी सांगितले की, ईडीने उच्च न्यायालयात स्पेशल कोर्टाने दिलेल्या निर्णायाविरोधात अपील केली होती. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Nov 8, 2021, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.