ETV Bharat / city

Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर खासगी रुग्णालयात उपचार? 'या' दिवशी न्यायालय देणार निर्णय - खासगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांचा न्यायालयात अर्ज

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्र न्यायालयात वैद्यकीय कारणास्तव अर्ज दाखल केला ( Anil Deshmukh Application Treatment In Private Hospital ) आहे. त्यावर उद्या ( 10 मे ) सत्र न्यायालय निकाल देणार ( Session Court Hearing Anil Deshmukh Hospital Treatment ) आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh
author img

By

Published : May 9, 2022, 8:01 PM IST

मुंबई - आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्र न्यायालयात वैद्यकीय कारणास्तव अर्ज दाखल केला ( Anil Deshmukh Application Treatment In Private Hospital )आहे. आपल्या खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर सोमवारी ( 9 मे ) दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यावर सत्र न्यायालय उद्या ( 10 मे ) निकाल देणार ( Session Court Hearing Anil Deshmukh Hospital Treatment ) आहे.

100 कोटी कथित वसुली प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 ला अटक केली होती. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. देशमुखांनी सत्र न्यायालयात वैद्यकीय अर्ज दाखल केला आहे. आपल्याला अनेक शारीरिक आजार आहेत. त्यात आपल्या दुखऱ्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. मात्र, जे.जे. रुग्णालयात उपचाराच्या सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे तेथील अपुऱ्या सुविधामुळे खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती देशमुखांनी न्यायालयाकडे स्वतः बाजू मांडत केली होती.

त्यावर सोमवारी न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा देशमुखांना खांदेदुखीचा त्रास असून, त्यावर तातडीने शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. तसेच, त्यांना हृदय विकाराचीही समस्या आहे. दुसरीकडे जे. जे या सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे त्याचे वय पाहता सरकारी ऐवजी खासगी रुग्णालयात अनुभवी शल्यविशारद कडून त्यांच्यावर स्वखर्चाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी देशमुखांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांच्याकडून न्यायालयात करण्यात आली.

अनिल देशमुख यांच्या खाजगी रुग्णालयातील उपचाराकरिता केलेल्या अर्जाला ईडीकडून तीव्र विरोध करण्यात आला. देशमुखांच्या खांद्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही, असा डॉक्टरांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. तसेच, गरज भासल्यास जे.जे रुग्णालयातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते. कारण जे. जे रुग्णालयातही सर्व अद्ययावत सोयी सुविधा आहेत, असा दावा ईडीच्यावतीने करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आपल्या निकाल राखून ठेवला आहे. त्यावर उद्या सुनावणी करण्याचे सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - NIA Raids In Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित 20 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी; तिघेजण ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.