ETV Bharat / city

अनिल देशमुख, सचिन वाझे यांसह चौघांच्या सीबीआय कोठडीत 16 एप्रिलपर्यंत वाढ - सचिन वाझे

कथीत शंभर कोटी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे या चारही आरोपींना सीबीआयने ताब्यात घेऊन त्यांचे सीबीआय कोठडी घेण्यात आली होती. आज सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या पुन्हा पाच दिवसाची कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकीलांकडून करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी (दि. 11 एप्रिल) पुन्हा या चारही आरोपींना 16 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी पाठवण्याचा निर्णय दिला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 11, 2022, 10:29 PM IST

मुंबई - कथीत शंभर कोटी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ), सचिन वाझे ( Sachin Waze ), कुंदन शिंदे, संजीव पालांडे या चारही आरोपींना सीबीआयने ताब्यात घेऊन त्यांचे सीबीआय कोठडी घेण्यात आली होती. आज सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या पुन्हा पाच दिवसाची कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वकीलांकडून करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी (दि. 11 एप्रिल) पुन्हा या चारही आरोपींना 16 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी पाठवण्याचा निर्णय दिला आहे.

यावेळी अनिल देशमुख यांचे वकील अॅड. विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख यांचे वय 73 आहे. ते काही आजारांशी झुंजत आहेत. बराच काळ अनिल देशमुख हे कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यात सचिन वाझे यांचा जवाब नोंदवला गेला. इतर आरोपीसोबत समोरासमोर चौकशी झाली. मग परत कोठडी मागून अजून कोणते जबाब तपास यंत्रणाना नोंदवायचे आहेत, असा युक्तीवाद केला.

तर, संजीव पलांडे यांचे वकील शेखर जगताप यांनी युक्तिवाद करताना पलांडे यास कशाप्रकारे त्रास दिला जात आहे, ते निदर्शनास आणून दिले. पाच-पाच तास एकाच ठिकाणी भिंतीकडे बघत बसायला लावणे, अस्वच्छ वातावरणात बसवणे, एका खोलीत चौकशी सुरू असताना वकीलांना बाहेर बसवणे हे किती योग्य आहे, असा सवाल उपस्थित करत सीबीआयकडे पुन्हा तोबा देऊ नये, अशी मागणी केली.

सीबीआयच्या बाजूने अॅड. रत्नदीप सिंग यांनी युक्तीवाद करताना गुन्ह्याची गंभीरता पाहता एक ते दोन वेळा कोठडी घेऊन सत्याची उकल करता येणार नाही. सध्या तपास करताना वारंवार आरोपी थांबतात. त्यामुळे चौकशीत व्यत्यय येतो. म्हणून आणखी कोठडीची गरज असल्याचे सांगितले. यावेळी आरोपींच्या वकीलांनी कोठडीत दूरव्यवहार केला जात असल्याचा दावा केला असता सीबीआयचे वकील रत्नदीप सिंग म्हणाले, असे काही झाले नाही. तसेच असे काही घडल्याचे पुरावे असल्यास न्यायालयाने रीतसर त्यासंदर्भात तक्रार अर्ज द्यावा, असे सांगितले.

दरम्यान, सचिन वाझे यांनी गोरेगाव प्रकरणात विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांचे नाव घेण्यासाठी सीबीआय दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती न्यायालयात दिली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पुन्हा सीबीआय कोठडी पाठवण्याचा निर्णय सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे.

हेही वाचा - JNPT Blast : जेएनपीटी बंदरामध्ये बॉयलारचा स्फोट; एकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.