ETV Bharat / city

Andheri East ByElection : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल उद्या भरणार उमेदवारी अर्ज - Murji Patel from BJP

अंधेरी पूर्व मतदार संघाचे ( Andheri East Constituency ) शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके ( Shiv Sena candidate Ramesh Latke ) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून यासाठी उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप व शिंदे महायुती ( Uddhav Thackeray group vs BJP and Shinde ) यांच्यात महत्त्वाची लढत होणार असून भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Andheri East ByElection
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक
author img

By

Published : Oct 12, 2022, 1:36 PM IST

मुंबई : अंधेरी पूर्व मतदार संघाचे ( Andheri East Constituency ) शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके ( Shiv Sena candidate Ramesh Latke ) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून यासाठी उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप व शिंदे महायुती ( Uddhav Thackeray group vs BJP and Shinde ) यांच्यात महत्त्वाची लढत होणार असून भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरजी पटेल उद्या सकाळी ९ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

चिन्ह, पक्ष वादानंतर पहिलीच निवडणूक ? अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार, रमेश लटके यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ३ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून अंधेरी पूर्व मतदार संघाच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप शिंदे महायुती ही खरी लढत होणार आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर नव्याने स्थापन झालेली, बाळासाहेबांची शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे गट हा नव्याने अस्तित्वात आला असून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पहिल्यांदाच निवडणुकीची रंगत दिसणार आहे. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देऊनआपला उमेदवार घोषित केला असला तरी सुद्धा शिंदे गटाने अजूनही आपला उमेदवार दिलेला नसून ही निवडणूक लढवणार की नाही हे सुद्धा स्पष्ट केलेलं नाही आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराबाबत अजूनही प्रश्नचिन्ह ? दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संभावित उमेदवार दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ऋतुजा लटके यांचा शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याने ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, हा पक्ष मशाल घेऊन या निवडणुकीत उतरला असून या पक्षाला काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनी पाठिंबा दिला आहे. शुक्रवार १४ ऑक्टोंबर हा या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.