ETV Bharat / city

Rituja Latke Reaction : 'ही' ​रमेश लटकेंच्या जिव्हाळ्याची पोचपावती; ऋतुजा लटकेंची भावनिक प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीत (Andheri East Assembly by election Update) ऋतुजा लटके (Rituja Latke Reaction) कोर्टकचेरी करत रिंगणात उतरल्या. या निवडणुकीची उत्कंठा वाढली असतानाच, शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरलेल्या भाजपने ऐनवेळी माघार घेतली. यामुळे लटकेंचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. ऋतुजा लटकेंनी यावर प्रतिक्रिया दिली. (by election going uncontested)

Rituja Latke Reaction
Rituja Latke Reaction
author img

By

Published : Oct 17, 2022, 3:18 PM IST

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीत (Andheri East Assembly by election Update) ऋतुजा लटके (Rituja Latke Reaction) कोर्टकचेरी करत रिंगणात उतरल्या. या निवडणुकीची उत्कंठा वाढली असतानाच, शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरलेल्या भाजपने ऐनवेळी माघार घेतली. यामुळे लटकेंचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. ऋतुजा लटकेंनी यावर प्रतिक्रिया दिली. जनतेसोबत रमेश लटकेंचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध, (Acknowledgment of Ramesh Latke) जनतेचा आशीर्वाद आणि विश्वासामुळे निवडणूक बिनविरोध (by election going uncontested) होणार आहे. प्रत्येकाचे मी आभार मानते, असे लटके म्हणाल्या.

पोटनिवडणुकीतून भाजपची माघार - अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीत ऋतुजा लटकेंनी निवडणूक लढवू नये, यासाठी अनेक अडथळे आणले. राजीनामा मिळवण्यासाठी कोर्टात जावे लागले. न्यायालयाने फटकारल्यानंतर लटकेंचा राजीनामा मंजूर झाला. दोन्ही कडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत नामांकन अर्ज भरला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा ही निवडणूक केंद्रबिंदू ठरली होती. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी भाजपचे कान टोचले. तर मन​​से प्रमुख राज ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र दिले होते. भाजपने यानंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

ही माझ्या पतीच्या कामाची पोचपावती- ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी यावर प्रतिक्रिया दिली. पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व नेत्यांचे आभार. आतापर्यंत अंधेरी पोट निवडणुकीच्या प्रचारात साथ देणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच पती रमेश लटके हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. राज ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांनी या मैत्रीची कदर करत ही अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील अनुभवी नेते शरद पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा दिला. या सर्वांची आभारी आणि कायम ऋणी राहीन, असे ऋतुजा लटके यांनी म्हटले. तसेच प्रत्येक जण रमेश लटके यांच्या कामाचे कौतुक करत होता, तसेच ते आपले सहकारी होते, असे सांगत होता. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणे, ही माझ्या पतीने केलेल्या कामाची पोचपावती आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली त्यासाठी मी प्रत्येकाचे आभार मानते, असे ऋतुजा लटके यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.