ETV Bharat / city

Andheri Assembly Election : अंधेरीत शिवसेना करणार थेट मतदारांशी संपर्क - Sena contact voters directly in Andheri

मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघ ( Andheri Assembly Constituency ) दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत ( Andheri Assembly Election ) शिवसेना चुरशीने लढणार आहे. मोठमोठ्या सभा घेण्याऐवजी प्रत्यक्ष मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर शिवसेनेचा भर ( Shiv Sena contact voters directly ) असणार आहे. रमेश लटके यांचे मतदारसंघातील काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रणनीती आखल्याचे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अनिल परब ( Anil Parab ) यांनी सांगितले.

Andheri Assembly Election
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुक
author img

By

Published : Oct 8, 2022, 7:43 PM IST

मुंबई - मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूक ( Andheri Assembly Constituency ) येत्या तीन नोव्हेबरला होणार आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके ( Late Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर होणारी निवडणूक ( Andheri Election ) अत्यंत चुरशीची असणार आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप ( Shiv Sena vs BJP ) अशी थेट लढत असली तरी शिवसेनेतील फुटीर शिंदे गटाची भाजपा उमेदवाराला मदत होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

अंधेरी पोटनिवडणूक

शिंदे गटाची अशीही गोची - एखाद्या मतदारसंघातील आमदाराचे निधन झाल्यास रिक्त झालेल्य़ा जागेवर त्यांच्या कुटूंबियांपैकी कोणी उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची नाही, असा महाविकास आघाडीचा अलिखित नियम आहे. त्यामुळे शिंदे जर शिवसेना म्हणून सांगत असतील तर, ते या नियमाच्याविरोधात वागतील का, जर त्यांनी स्वतः उमेदवार दिला नाही, भाजपच्या उमेदवाराला मदत केली तरीही तै नैतिकदृष्ट्या त्यांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे शिंदे गटाची या निवडणूकीत नैतिक गोची झाली आहे.

भाजपला शिंदे गटाचे पाठबळ - शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देऊन स्थानिक मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय रमेश लटके यांचे मतदार संघातील कार्य सहाय्यभूत ठरेल असे शिवसेनेला वाटतं. तर मुरजी पटेल या भाजपच्या बंडखोर उमेदवाराला यावेळी भाजप अधिकृतरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे. पटेल यांनी गेल्या निवडणुकीत लटके यांना चांगली टक्कर दिली होती. त्यातच आता शिंदे गटाचे पाठबळ आणि भाजपच्या अधिकच्या ताकदीच्या बळावर ही जागा जिंकून आणता येईल असा विश्वास भाजपचे प्रवक्ते अजय सिंह यांनी व्यक्त केला आहे.

उत्तर भारतीय मतांवर मदार - अंधेरी पूर्व मतदार संघातील उत्तर भारतीय मतांवर निवडणुकीची बहुतांश मदार असणार आहे. या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मुरजी पटेल हे स्थानिक नगरसेवक होते त्यामुळे त्यांची मतदारसंघात बऱ्यापैकी पकड आणि कामे आहेत. त्यामुळे ही मते भाजपलाच मिळतील असा दावा भाजपा प्रवक्ते अजय सिंह यांनी केला आहे.

शिवसेना घरोघरी जाणार - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी फिरण्याची शिवसेनेला गरज नाही. या मतदारसंघात मोठ मोठ्या सभा घेण्यापेक्षा रोजच्या संपर्कातील लोकांना प्रत्यक्ष भेटणार आहोत. दिवंगत रमेश लटके यांनी केलेल्या कार्याच्या आधारावरच मते मागणार असल्याने लोकांशी थेट घरोघरी जाऊन संपर्क साधणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले. या मतदारसंघात बहुभाषिक मतदार असले तरी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेलाच मते मिळतील तर स्थानिक कार्याच्या जोरावर बहुभाषीक मतदार लटके यांनाच पसंती देतील, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. या शिवाय या निवडणूकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जात आहोत. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची या मतदारसंघातील बळाचाही आम्हाला फायदा होणार आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसने २७ हजार मते घतेली होती हे विसरूनही चालणार नाही, असेही परब म्हणाले.

चिन्हा शिवाय लढण्याचाही पर्याय - शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर गेला आहे याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच सुनावणी होणार आहे. या सुनावणी चिन्ह शिवसेनेसोबतच राहील असा विश्वास शिवसेनेला वाटतो आहे मात्र तसे न झाल्यास उगवता सूर्य ढाल तलवार अथवा गदा यापैकी एक चिन्ह घेऊन लढण्याचा पर्यायही शिवसेनेने ठेवला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.