मुंबई : आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी क्लीन चिट एनसीबीकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अभिनेत्री अनन्या पांडेचीही चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी अनन्या पांडेने एनसीबीला दिलेल्या जबाब असे म्हटले आहे की, वीड ड्रग्ज विकत घेण्याशी संबंधित चॅटवर सांगितले होते की, हा फक्त एक विनोद होता, असे आनंदाने एनसीबीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
अनन्या पांडेने आरोपांचे केले खंडन : मुंबईतील प्रसिद्ध क्रुझ ड्रग्ज प्रकरणात किंग खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीने त्याला क्लीन चिट दिली आहे. आरोपपत्रात त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडलेला नाही. तसेच आर्यन खानने अन्य आरोपींसोबत कट रचल्याचेही सिद्ध झालेले नाही. त्याचबरोबर अभिनेत्री अनन्या पांडेच्या वक्तव्याचाही आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये अनन्या पांडेने एनसीबीला सांगितले की, आर्यन आणि त्याच्यामधील मोबाईलवरील चॅटवर वीड प्रोक्योरमेंटची चर्चा ही निव्वळ विनोद होती. आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, आर्यनने अभिनेत्री अनन्या पांडेसोबत संभाषण केल्याची कबुली दिली होती. परंतु, अनन्या पांडेने या गप्पा निव्वळ विनोद असल्याचे म्हटले आहे.
ड्रग्स चॅटवर अनन्याने एनसीबीला काय उत्तर दिले : एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले आणि काही प्रश्न विचारले, ज्यावर अनन्या म्हणाली की, ती फक्त विनोद करीत होती. अनन्या पांडेने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. अनन्याने सांगितले की, तिने कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. एनसीबीच्या मते, आतापर्यंत असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत की अनन्याने आर्यनसाठी कधीच कोणत्याही ड्रग्जची व्यवस्था केली आहे.
अरबाज मर्चंटने आरोप फेटाळले : या प्रकरणाशी संबंधित अभिनेता अरबाज मर्चंटच्या वक्तव्यानुसार आर्यन खानने त्याला क्रूझवर ड्रग्ज न घेण्यास सांगितले होते. कारण एनसीबी येथे सक्रिय आहे. असे असतानाही अरबाजने चपलांमध्ये गांजाचे छोटे पाकीट लपून आणला होते. अरबाज मर्चंटने कधीही असा दावा केला नाही की, त्याच्या जवळ सापडलेली 6 ग्रॅम चरस आर्यनच्यासाठी होती. आर्यननेदेखील दिलेल्या जबाबात हे मान्य केले नाही की, जप्त केलेला गांजा त्याचा आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की निर्दोष असूनही आर्यनला ज्या छळाला सामोरे जावे लागले, त्यामुळे तो काही कायदेशीर कारवाई करू शकेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे
हेही वाचा : NCB chief SN Pradhan Press Video : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर एनसीबी प्रमुख प्रधान यांची पत्रकार परिषद, म्हणाले आर्यन खानला..