मुंबई - गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार असल्याने आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येण्यापासून वंचित राहिले आहेत. यंदाही सरकार अनुयायांना वंचित ठेवू पाहत आहे. मात्र, यंदा काही झाले तरी आंबेडकरी जनता चैत्यभूमीला येणारच, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर ( Anandraj Ambedkar on Mahaparinirvan Din ) यांनी दिला आहे.
दरवर्षी (Ambedkar followers visit to Chaityabhumi ) 6 डिसेंबरला चैत्यभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी येतात.
आंबेडकरी अनुयायी येणारच -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना ( MH guidelines for Mahaparinirvan Din ) जाहीर केल्या आहेत. विदेशात ओमिक्रॉन विषाणूंचा फैलाव वेगाने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दी होणारे कार्यक्रम त्यामुळे आयोजित करू नये, असे आवाहन राज्य सराकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर म्हणाले, की राज्यात सर्व मंदिरे खुली केली जात आहेत. शाळा सुरू केल्या जात आहेत. असे असताना फक्त आंबेडकरी अनुयायांवर बंदी का ? चैत्यभूमीला येण्यापासून आंबेडकरी अनुयायांना रोखण्याच्या प्रकाराचा निषेध करतो. हा प्रकार म्हणजे आंबेडकरी अनुयायांवर वैचारिक हल्ला आहे. यंदा कितीही बंदी घातली तरी आंबेडकरी अनुयायी येणारच आहेत. राज्य सरकार महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाला कोणतीही मदत करत नाही. मुंबई महापालिकेकडून कार्यक्रमाला मदत केली जाते. राज्य सरकारने कार्यक्रमावर बंदी घालणे चुकीचे असल्याचे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-New Chief Secretary : देबाशीष चक्रवर्ती राज्याचे नवीन मुख्य सचिव
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहन -
विदेशात ओमिक्रॉनचा संसर्ग फोफावला आहे. राज्य सरकारने याची धास्ती घेत, उपाययोजना हाती घेतल्या आहेत. येत्या 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येथे येतात. गेल्या दोन वर्षात कोरोनाचे सावट असल्यामुळे महापरिनिर्वाण दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. संकट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जातो आहे. राज्य सरकार यामुळे अलर्ट मोडवर आले आहे. यंदा गेल्या वर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
हेही वाचा-Maratha Reservation : मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख
काय आहेत नवीन सूचना -
- महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करणे. कोविड -१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीत "ब्रेक द चेन"अंतर्गत दिलेल्या ( Latest Break the chain rule in Maharashtra ) सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे.
- भारतीयांसाठी दुःखाचा गांभीर्याने पालन करावयाचा असून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे.
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सर्व अनुयायांनी चैत्यभूमीवर न येता घरी राहूनच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील.
- थर्मल स्क्रिनिंगच्या तपासणीअंती ज्यांचे शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच कार्यक्रमास उपस्थित रहाण्यासाठी परवानगी दिली जाईल.
- कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करणे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.
- महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत. कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत.
- राज्यातील सर्व जिल्हे, तालुके यामध्येही कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक, जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक ते सनियंत्रण व उपाययोजना कराव्यात.
- ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारचा नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे.
हेही वाचा-Omicron Corona new Variant : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह