ETV Bharat / city

अपक्षांच्या जोरावर महाडिक विजयी, असे झाले मतदान - धनंजय महाडिक विजय राज्यसभा

भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनी अनपेक्षितरित्या ( Analysis of Rajya Sabha election voting ) विजय मिळवला आहे. या विजयात अपक्षांची ( Dhananjay Mahadik win in Rajya sabha election ) आणि एमआयएमची मते फोडण्यात भाजप यशस्वी झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतात मताधिक्‍य ( Rajya sabha election voting ) मिळवत महाडिक यांचा विजय झाला.

Analysis of Rajya Sabha election voting
धनंजय महाडिक विजय राज्यसभा
author img

By

Published : Jun 11, 2022, 12:24 PM IST

मुंबई - भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनी अनपेक्षितरित्या ( Analysis of Rajya Sabha election voting ) विजय मिळवला आहे. या विजयात अपक्षांची ( Dhananjay Mahadik win in Rajya sabha election ) आणि एमआयएमची मते फोडण्यात भाजप यशस्वी झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतात मताधिक्‍य ( Rajya sabha election voting ) मिळवत महाडिक यांचा विजय झाला.

हेही वाचा - मुंबईत पावसाळ्याची चाहूल, रात्रभर पावसाची रिपरिप वातावरणात गारवा

धनंजय महाडिक हे विजयी होतील असा दावा सुरुवातीपासूनच भाजपा करीत होता. मात्र, भाजपने सर्व पक्ष आणि छोट्या पक्षांना एकत्र करून विजयाला गवसणी घातली आहे. अपक्ष आपल्याकडे वळवून घेण्यात भाजपाने बाजी मारली आहे, तर प्राधान्यक्रमाची मते अधिक आपल्या पहिल्या दोन उमेदवारांच्या पारड्यात टाकून त्या मतांचे मुल्य वाढवत पसंतीक्रममध्ये बाजी मारल्याने महाडिक यांचा विजय सुकर झाला. त्यातच पहिल्या पसंतीची तीन मते महाविकास आघाडीने गमावल्यामुळे त्याचा फटका संजय पवार यांना बसला, त्यामुळे संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला.

काय होते मतांचे गणित? - भाजप आघाडीकडे ११२ मते होती. त्यात भाजपचे १०६ तसेच जनसुराज्य पक्ष आणि मनसे १ आणि ४ अपक्ष यांचा समावेश होता. भाजपच्या पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांना पहिल्या पसंतीची ४८-४८, तर धनंजय महाडिक यांना २६ मते मिळाली. ही एकूण मते १२२ झाली. भाजपने संख्याबळापेक्षा १० मते जास्त घेतली. बविआची ३, रासपचे १, तसेच ६ अपक्षांची मते भाजपला मिळाली असावीत. एमआयएमची दोन यामध्ये असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे, त्यामुळे दुसऱ्या फेरीत ४१४० मते मुल्य घेऊन महाडिक यांनी ४०५८ चा कोटा पूर्ण केला.

काय होते दुसऱ्या फेरीचे गणित ? - भाजपच्या पीयूष गोयल यांना ४८ मते मिळाली. मताचे मुल्य होते ४८००. महाडिकांना आवश्यक ४०५८ मते वजा केल्यास शिल्लक राहतात ७४२ मत मुल्ये. त्याला ४८ ने भागले असता १५.४५ मते महाडिक यांना मिळाली. त्याला गोयल यांच्या ४८ मतांनी गुणल्यास मत मुल्य होते ७२०. हे ७२० आणि बोंडे यांची ७२० मत मुल्ये, तसेच महाडिक यांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांचे मुल्य २७०० असे एकूण ४१४० मत मूल्य (४१.४० मते) घेऊन महाडिक विजयी झाले. पसंती प्रेमाच्या या गणितात भाजपाने बाजी मारल्याने त्यांना विजय मिळवता आला. महाविकास आघाडीकडे मुळातच एकेका पक्षाकडे मते कमी असल्याने त्यांना पसंती क्रमामध्ये जास्त मते टाकता आली नाहीत, हेच संजय पवार यांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे.

हेही वाचा - Anil Desai : भाजपसोबत कोण, कसे गेले, हे पडताळून पाहिले.. पक्ष त्यावर विचार करणार - अनिल देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.