ETV Bharat / city

Katrina Vicky Wedding : बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांना लग्नाच्या व्हिडिओसाठी 100 कोटींची ऑफर - katrina kaif marriage date

बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ( Bollywood actress Katrina Kaif ) आणि अभिनेता विकी कौशल ( Actor Vicky Kaushal) यांच्या लग्नाची सध्या देशाच्या विविध भागात चर्चा होत आहे. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबरला राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात एका शानदार सोहळ्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांना त्यांच्या लग्नाचे खास व्हिडिओ घेण्यासाठी १०० कोटी रुपयांची ऑफर ( special video of Katrina-Vicky wedding ) देण्यात आली आहे.

special video of Katrina Vicky wedding
बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल
author img

By

Published : Dec 7, 2021, 1:37 PM IST

Updated : Dec 7, 2021, 2:59 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ( Bollywood actress Katrina Kaif ) आणि अभिनेता विकी कौशल ( Actor Vicky Kaushal) यांना त्यांच्या लग्नाचे खास व्हिडिओ घेण्यासाठी १०० कोटी रुपयांची ऑफर ( special video of Katrina Vicky wedding ) देण्यात आली आहे. पिंकविलाने दिलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

  • कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबरला अडकणार बंधनात -

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची सध्या देशाच्या विविध भागात चर्चा होत आहे. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबरला राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात एका शानदार सोहळ्यात लग्नबंधनात अडकणार ( actress Katrina Kaif and actor Vicky Kaushal Wedding ) असल्याचे बोलले जात आहे. सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे हा शाही विवाह होणार आहे.

  • कॅटरिनाने माध्यमाशी बोलायचे टाळले -

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबर २०२१ रोजी जयपूरमध्ये विवाहबद्ध होणार आहेत. मग काय ते कुठल्या हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. कॅटरिना विकीचा वेडिंग कॉश्च्युम काय असणार इथंपासून ते कॅटरिनाची मेहेंदी, गेस्ट लिस्ट, गेस्टसाठीचे नियम अशा एक ना विविध बातम्या रोज चर्चेत येऊ लागल्या. आणि मग काय एवढ्या बातम्या रोज बाहेर आल्यानंतर या दोघांनी जरी आपल्या लग्नावर बोलणे टाळले असलं तरी आता मुंबई विमानतळावरने जयपूरसाठी निघालेले आणि जयपूर विमातळावर पोहोचलेल्या कॅटरिना विकीच्या कुटुंबियांना मीडियाच्या कॅमेऱ्याने अखेर आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेच.

  • लग्नात मोबाईल फोनवर बंदी -

विकी आणि कॅटरिनाच्या लग्नासाठी रॉयल स्टाइल मंडप तयार केला जात आहे, जो संपूर्णपणे काचेचा असेल. लग्नाची थीम पेस्टल आहे. लग्नात मोबाईल फोनवर बंदी घालण्यात येणार असून या हायप्रोफाईल लग्नासाठी बाऊन्सर ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची टीम लग्नासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करणार आहे.

  • कॅटरिना विकीला १०० कोटी रुपयांची ऑफर -

पाश्चिमात्य देशांमध्ये सेलिब्रिटी जोडप्यांच्या लग्नाचे खास फुटेज विकण्याची प्रथा आहे. यासाठी त्याने कॅटरिना आणि विकीला त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओसाठी १०० कोटी रुपयांची मोठी ऑफर दिली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की जर जोडप्याने ऑफर स्वीकारली तर त्यांचे शाही लग्न एखाद्या फीचर फिल्मप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादर केले जाईल. लग्नाच्या व्हिडिओ व्यतिरिक्त, दोन बॉलीवूड तारे काही कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या खास मुलाखती देखील दर्शवतील, ज्यामध्ये ते विकी आणि कॅटरिनाच्या नात्याबद्दल बोलताना दिसू शकतात.

  • दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने नाकारली होती ऑफर -

२०१८ मध्ये लग्न झालेल्या बॉलीवूड जोडप्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना यावेळी एका OTT प्लॅटफॉर्मने अशीच ऑफर दिली होती, परंतु तिने हा प्रसंग खाजगी ठेवायचा आहे असे सांगून ती ऑफर नाकारली. आता कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ही ऑफर स्विकारतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - How Vicky Kaushal proposed Katrina Kaif : विकी कौशलने 'अशा'प्रकारे प्रपोज करताच कॅटरिना झाली फिदा

हेही वाचा - Katrina Kaif's Mehndi Price : कॅटरिना आणि विकी करणार 'येथे' शाही विवाह; कॅटरिना कैफच्या मेहंदीची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

हेही वाचा - बॉलिवूडमध्ये लवकरच वाजणार सनई-चौघडे; विकी- कॅटरीनाने गुपचूप उरकला साखरपुडा?

हेही वाचा - विकी कौशल आणि कॅटरिना अडकणार विवाह बंधनात?

हेही वाचा - Vicky-Katrina leaves for Sawai Madhopur : विकी कौशल आणि कॅटरिना कैफ विवाहासाठी सवाई माधोपूरला रवाना

Last Updated : Dec 7, 2021, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.