ETV Bharat / city

'तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, हे NCB कार्यालय आहे'; एनसीबी अधिकाऱ्याने अनन्याला फटकारले

अनन्या काल दुपारी 2.15 च्या सुमारास एनसीबी कार्यालयात पोहोचली आणि तिचे वडील चंकी पांडे यांच्यासोबत संध्याकाळी 6.21 वाजता बाहेर पडली. एनसीबीने तिला सोमवारीदेखील या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान अनन्या पांडेने ड्रग्ज सेवन आणि पुरवठा करण्याच्या गोष्टीला नाकारले आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे
अभिनेत्री अनन्या पांडे
author img

By

Published : Oct 23, 2021, 12:11 PM IST

मुंबई - एनसीबी कार्यालयात उशिरा पोहोचलेल्या अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगलंच फैलावर घेतलं. हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, हे NCB कार्यालय आहे’, अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसावलं. सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावलेली अनन्या एनसीबीच्या कार्यालयात दुपारी 2 वाजता गेली. यामुळे समीर वानखेडे यांनी फटकारले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव समोर आलं आहे. तिने आर्यन खानशी ड्रग्जसंबंधित व्हॉट्सअप चॅट केल्याचं समोर आलं आहे. याचप्रकरणी एनसीबी तिची चौकशी करत आहे. गुरुवारी अनन्या पांडेचं नाव समोर आल्यानंतर एनसीबीने थेट अनन्याचं घर गाठलं. तिला दुपारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स दिलं. तिची त्याच दिवशी 2 तास चौकशीही केली गेली. काल (शुक्रवारी) पुन्हा एकदा अनन्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र अनन्या उशिरा गेल्याने समीर वानखेडे यांचा चांगलाच पारा चढला.

अनन्या पांडेने ड्रग्ज सेवन आणि पुरवठा करण्याच्या गोष्टीला नाकारले

अनन्या काल दुपारी 2.15 च्या सुमारास एनसीबी कार्यालयात पोहोचली आणि तिचे वडील चंकी पांडे यांच्यासोबत संध्याकाळी 6.21 वाजता बाहेर पडली. एनसीबीने तिला सोमवारीदेखील या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान अनन्या पांडेने ड्रग्ज सेवन आणि पुरवठा करण्याच्या गोष्टीला नाकारले आहे.

चौकशीत काय झालं?

गुरुवारी जेव्हा अनन्या पांडे तिचे वडील चंकी पांडे यांच्यासह NCB च्या झोनल हेड क्वार्टरमध्ये दुपारी 4 च्या सुमारास पोहोचली, तेव्हा चंकी पांडेला चौकशीतून बाहेर बसवले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकारी व्ही.व्ही.सिंग, झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि एका महिला अधिकाऱ्याने अनन्या पांडेची चौकशी केली. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की अनन्या पांडेने सांगितले की ती धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आर्यन खानसोबत शिकली आहे आणि ती आर्यन खानची बहीण सुहानाची जवळची मैत्रीण आहे. यामुळे, आर्यन, सुहाना आणि अनन्या हे एकमेकांचे कौटुंबिक मित्र आहेत. शूटिंग शेड्यूल व्यतिरिक्त, जेव्हा ती घरी राहते, तेव्हा प्रत्येकजण एकत्र येतात, ज्यामध्ये शाळेतील मित्रांचे एक सर्कल देखील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान अनन्याने NCB ला व्हिडीओ चॅट बद्दल सांगितले की ही चॅट त्यावेळी सिगारेट आणण्याच्या संदर्भात होती, बराच वेळ निघून गेला आहे, यामुळे तिला नक्की कोणत्या संदर्भात ही गोष्ट आठवत नाही आणि वीड हे एक ड्रग्ज आहे याची त्यांना जाणीव नव्हती.

ड्रग्स चॅटवर अनन्याने एनसीबीला काय उत्तर दिले?

एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले आणि काही प्रश्न विचारले, ज्यावर अनन्या म्हणाली की, ती फक्त विनोद करत होती. अनन्या पांडेने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. अनन्याने सांगितले की, तिने कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. एनसीबीच्या मते, आतापर्यंत असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत की अनन्याने आर्यनसाठी कधीच कोणत्याही ड्रग्जची व्यवस्था केली आहे. मात्र, आर्यन-अनन्या यांनी ड्रग्जबाबत एकदा नव्हे, तर अनेक वेळा संभाषण केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.