ETV Bharat / city

Extra Electricity Bills Issue : मुंबईकरांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची होणार चौकशी.. मुंबई महापालिकेकडून समिती स्थापन

कोरोना काळात मुंबईकरांना वाढीव बीज बिल देण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या ( Extra Electricity Bills Issue ) होत्या. याबाबत मुंबई महापालिकेने दखल घेऊन पाच सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली ( Inquiry Committee Has Been Formed By BMC ) आहे.

वाढीव वीज बिलांची होणार चौकशी
वाढीव वीज बिलांची होणार चौकशी
author img

By

Published : Feb 8, 2022, 7:33 PM IST

मुंबई - कोरोनाच्या प्रसारादरम्यान लॉकडाउनमुळे ( Lockdown In Mumbai ) सर्वांचे आर्थिक गणित बिघडले होते. अशा काळात बेस्ट उपक्रमाकडून ग्राहकांना जादा बिले पाठवून त्याची आकारणी करण्यात ( Extra Electricity Bills Issue ) आली. याविरोधात मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली ( Inquiry Committee Has Been Formed By BMC ) आहे. ही समिती आढावा घेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना अहवाल सादर करणार आहे.

मुंबईकरांना वाढीव वीज बिल

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. काही दिवसातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. मुंबईप्रमाणेच राज्यात आणि देशभरात कोरोनाचा प्रसार झाला. राज्यात जनता कर्फ्यू लावण्यात आला. यानंतर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन लावला. हा लॉकडाऊन जून पर्यंत सुरु होता. जूनपासून लॉकडाऊनमधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. यादरम्यान उद्योग धंदे कार्यालये बंद असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. लाखों लोक बेरोजगार झाले. अचानक लॉकडाऊन लागल्याने लोकांचे आर्थिक अडचणी वाढल्या. आर्थिक परिस्थिती अडचणीची झाली असताना मुंबईमधील बेस्टच्या विज ग्राहकांना वाढ़ीव बिले आली. याविरोधात ग्राहकांनी आवाज उचलला. या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती. त्यावर पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश देत मुख्य लेखापरीक्षक सिताराम काळे यांच्या अध्यक्षतेखााली ५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

चौकशी समितीची नियुक्ती

मुंबईमधील बेस्ट ग्राहकांच्या वाढी वीज बिला सदंर्भात चौकशी करण्यासाठी मुख्य लेखापरीक्षक सिताराम काळे यांच्या अध्यक्षेतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये अनिल बडगुजर उप मुख्य लेखापरीक्षक (सचिव), महेंद्र उरणकर सहायक महाव्यवस्थापक ( सदस्य), रा. या. डुबल सहायक महाव्यवस्थापक (विधी, सदस्य), आनंद पाटील लेखापरीक्षा ( सदस्य) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती आढावा घेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना अहवाल सादर करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.