ETV Bharat / city

Amruta Fadnavis on Cm Thackeray : वजनदार ने हल्के को.. अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे खोचक टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Amruta Fadnavis on Cm Thackeray ) व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला आहे. असे असताना देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस ( Amruta Fadnavis tweet ) यांनी आता ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला.

Amruta Fadnavis on Cm uddhav thackeray on twitter
अमृता फडणवीस ट्विट
author img

By

Published : May 16, 2022, 2:21 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Amruta Fadnavis on Cm Thackeray ) व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला आहे. असे असताना देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis tweet ) यांनी आता ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला.

  • वज़नदार ने हल्के को,
    बस हल्के से ही वज़न से,
    कल ‘हल्का’ कर दिया ... 🙃#Maharashtra

    — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Kirit Somaiya on Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार - भाजप नेते किरीट सोमैया

काय आहे ट्विट मध्ये? - वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल 'हल्का' कर दिया.. या ट्विटद्वारे अमृता फडणवीस सुचवू इच्छितात की, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील बीकेसी सभेमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरून जहरी टीका केली होती. त्या टीकेला काल देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीय संकल्प सभेमध्ये त्याच पद्धतीने उत्तर दिलेले आहे व या उत्तराला महत्त्वाचा मुद्दा धरत वजनदार माणसाने, हलक्या माणसाला हलक्या वजनानेच अजून हलके करून टाकले, असे त्यांनी सांगितले आहे.

वजनावरून मुख्यमंत्री, फडणवीस जुगलबंदी! - मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसीमधील सभेत बाबरी मशीद प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या वजनावरून जहरी टीका केली होती. जर देवेंद्र फडणवीस बाबरी मशिदीवर चढले असते, तर त्यांच्या वजनाने ती खाली पडली असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मुंबई, गोरेगाव येथील सभेत भरपूर समाचार घेतला.

मी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, म्हणजे माझ्यावर त्यांचा किती विश्वास आहे. आज माझे वजन १०२ किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझे वजन १२८ किलो होते. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे झाले तर सामान्य माणसाचा एफएसआय जर १ असेल तर माझा एफएसआय १.५ आहे. आणि बाबरी काढायला गेलो तेव्हा माझा एफएसआय २.५ होता. उद्धव ठाकरे यांना असे वाटते माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझे राजकीय वजन कमी होईल. मात्र, हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार आहे, असे देवेंद्र फडणवीस सभेत म्हणाले होते.

हेही वाचा - उताराला लागलेल्या गाडीचा अपघात अटळ, संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.