ETV Bharat / city

'ए भाई , तू जो कोण असशील' अमृता फडणवीस आक्रमक - mumbai breaking news

भाई जगताप यांनी केलेली टीका अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. अमृता फडणवीस यांनी आक्रमक होत एकेरी भाषेत भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

amrita-fadnavis-responds-aggressively-to-bhai-jagtap
'ए भाई , तू जो कोण असशील' अमृता फडणवीस आक्रमक
author img

By

Published : Mar 23, 2021, 3:40 PM IST

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. या पत्रामुळे एकच खळबळ माजली. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपामुळे विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं, असा सवाल भाई जगताप यांनी फडणवीस यांना विचारला.

यावर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. भाई जगताप यांनी केलेली टीका अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. अमृता फडणवीस यांनी आक्रमक होत एकेरी भाषेत भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस-
"ए भाई , तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही 'UTI बैंक / Axis बैंक' ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचे न्हाय!," असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

महाविकास आघाडी सरकारवर अमृता फडणवीस नेहमीच टीका करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही त्या टीका करत असतात. मात्र यावेळच्या ट्विटमध्ये त्यांची भाषा आक्रमक वाटली. त्यांनी भाई जगताप यांचा उल्लेख एकेरी शब्दात केला. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या या आक्रमक ट्विटला भाई काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा- परमबीर प्रकरण : काँग्रेस मंत्र्यांची पाच वाजता महत्वाची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.