ETV Bharat / city

अमिताभ बच्चनने SBIला दिली भाड्याने जागा! मिळणार इतके भाडे...

अमिताभ बच्चनने जुहू परिसरात बरेच बंगले खरेदी केले आहेत आणि असे म्हटले जाते की त्या परिसरातील कोणताही बांगला विकायचा असेल तर पहिल्यांदा अमिताभला कळविले जाते. पुढे असेही कानावर पडते की त्याच्या जलसाच्या आजूबाजूला त्याचे अर्धा डझन बंगले आहेत. आता असे कळतंय की अमिताभ बच्चनने आपल्या बंगल्यांपैकी काहींचे तळमजले भाड्यावर दिलेले आहेत.

Amitabh Bachchan rents space to SBI! So much rent ...
अमिताभ बच्चनने SBIला दिली भाड्याने जागा! मिळणार इतके भाडे...
author img

By

Published : Oct 10, 2021, 6:15 PM IST

मुंबई - जुहू परिसरातील जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम (JVPD) ही उच्चभ्रू वस्ती मानली जाते. या परिसरात अनेक फिल्मी कलाकारांचे बंगले आहेत. जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, अनिल कपूर, अजय देवगण ई. बॉलिवूड स्टार्स या परिसरात वस्तीला आहेत. त्याचबरोबर मिलेनियम सुपरस्टार अमिताभ बच्चन सुद्धा याच परिसरात राहतो. आधी प्रतीक्षा बंगल्यात राहणारे बच्चन कुटुंबीय गेल्या दशकापासून जवळच्याच जलसा या बंगल्यात राहतात. कोरोना फैलावण्याआधी दर रविवारी याच बंगल्यासमोर रविवारी चाहत्यांची गर्दी उसळत असे कारण अमिताभ बंगल्याच्या गच्चीत येऊन त्यांना अभिवादन करीत असे. खरंतर या प्रकारामुळे दर रविवारी संध्याकाळी त्या परिसरात प्रचंड ट्राफिक जॅम होत असे. आता कोरोना महामारीमुळे जमावबंदी असल्याकारणाने असे काही घडताना दिसत नाही.

अमिताभ बच्चनने हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली आणि आजही तो ‘ईन-डिमांड’ कलाकार आहे. त्याने जुहू परिसरात बरेच बंगले खरेदी केले आहेत आणि असे म्हटले जाते की त्या परिसरातील कोणताही बांगला विकायचा असेल तर पहिल्यांदा अमिताभला कळविले जाते. पुढे असेही कानावर पडते की त्याच्या जलसाच्या आजूबाजूला त्याचे अर्धा डझन बंगले आहेत. बच्चन कुटुंबीय जलसामध्ये शिफ्ट झाल्यावर अमिताभच्या मातोश्री तेजी बच्चन यांनी प्रतीक्षामध्येच राहणे पसंत केले होते. आता असे कळतंय की अमिताभ बच्चनने आपल्या बंगल्यांपैकी काहींचे तळमजले भाड्यावर दिलेले आहेत. त्याने आणि अभिषेकने जलसा जवळीलच अम्मू आणि वत्स बंगल्यांचे काही भाग स्टेट बँकेला भाडेतत्वावर दिलेत. अर्थातच त्यांना रग्गड भाडे मिळणार असून ही जागा १५ वर्षांच्या लीजवर दिली गेली आहे. याआधी येथे सिटी बँक होती जिने २०१७ मध्ये लीज रिन्यू केली नाही.

रिअल इस्टेट अनॅलिटीक्स आणि रिसर्च कंपनी Zapkey.com ने बच्चन कुटुंब आणि स्टेट बँक यांच्यातील १५ वर्षांच्या कराराची कागदपत्रे मिळवली आहेत, ज्यातून असे कळते की सध्या बँकेकडून अमिताभला दरमहा १८.९ लाख रुपये भाडे घेणार आहे. या परिसरातील प्रति चौरस फूट रेट ₹६०० च्या आसपास आहे आणि भाड्यावर दिलेल्या जागेचे क्षेत्रफळ ३१५० चौरस फूट आहे. म्हणजेच अमिताभला बाजार दराच्या तुलनेत किंचित जास्तच भाडेकिंमत मिळाली आहे. वरील नमूद केलेल्या रिसर्च फर्मने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, ‘लीज डीड’ ची नोंदणी २८ सप्टेंबर रोजी करण्यात आली आणि या करारासाठी नोंदणी शुल्क म्हणून ₹३०.८६ लाख आणि ₹३०००० रजिस्ट्रेशन शुल्क भरले गेले आहे. सध्या मिळणाऱ्या ₹१८.९ लाख भाड्यात पाच वर्षांनी वाढ होऊन ती ₹२३.६ लाख होईल आणि नंतर शेवटच्या ५ वर्षांत ₹२९.५३ लाख होईल. इतके वर्ष बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी आपल्या जागांचा सदुपयोग करत रग्गड कमाईचा मार्ग शोधला आहे हे नक्की.

हेही वाचा - आर्यन खानला 'कस्टडी'त भेटणारी, 'सुटके'साठी तळमळणारी, कोण आहे ही 'भावूक' होणारी पूजा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.