मुंबई - राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी एका नवजात बालकाच्या आजारावर उपचार करण्यासाठी त्याच्या कुटुंबाला २ लाखाची मदत केली.
अमित यांचा आज वाढदिवस आहे. यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्वामी फाउंडेशन संस्थापकीय अध्यक्ष आणि ठाणे विभाग अध्यक्ष महेश कदम हे आज त्यांच्या निवासस्थानी कृष्ण कुंज येथे गेले. यावेळी त्यांनी एका नवजात बाळाच्या मेंदूत पाणी झाले असल्याचे अमित यांना सांगितले. त्यानंतर अमित यांनी नवजात बाळाच्या कुटुंबीयांना २ लाखाची आर्थिक मदत केली.